नवी दिल्ली । नेपाळ मध्ये भारतापेक्ष स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत असल्यामुळे (Petrol and Diesel) नेपाळहून भारतातून तेल आणल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर नेपाळ ऑईल कॉर्पोरेशनने सीमावर्ती जिल्ह्यातील पेट्रोल पंपांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमधील आठव्या क्रमांकामध्ये असे म्हटले गेले आहे की,’भारतीय गाड्यांमध्ये (ट्रक) 100 लिटरपेक्षा जास्त डिझेल देऊ नये. याशिवाय गॅलन किंवा कंटेनरमध्येही डिझेल / पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. नेपाळमधील भारतीय चलनानुसार पेट्रोल 70 रुपये 31 पैसे तर डिझेल 59 रुपये 69 पैसे प्रतिलिटर आहे. नेपाळमध्ये भारतातील एक रुपया 60 पैशांच्या बरोबरीचा आहे.
पेट्रोल पंप दररोज तपासले जाईल
नेपाळ ऑईल कॉर्पोरेशनच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की, प्रत्येक सीमावर्ती जिल्ह्यातील किमान 5 पेट्रोल पंप दररोज तपासले पाहिजेत आणि इथे इंधनाचा काळाबाजार तर होत नाही ना हे तपासले पाहिजे. तसेच भारताकडे जाणाऱ्या गाड्यांच्या तपासणीबाबतही असे लिहिले गेले आहे. कोरोनामुळे भारत-नेपाळ सीमेवर वाहनांची हालचाल प्रतिबंधित आहे. केवळ आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी ट्रकना वैध कागदपत्रांसह सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जात आहे. जेव्हापासून भारतात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत, तेव्हापासून नेपाळमधून भारतात चोरून तेल विक्री होत असल्याचे वृत्त आहे.
नेपाळ ऑईल कॉर्पोरेशनने कठोर पाऊले उचलली आहेत
जे ट्रक भारतकडून नेपाळमध्ये आवश्यक वस्तू घेऊन जातात, ते आपल्या रिकाम्या टाक्या फुल्ल करून परत जाऊ शकतात. याशिवाय अनेक दुचाकीस्वारसुद्धा असे करण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत. या बातम्या लक्षात घेता आता नेपाळ ऑईल कॉर्पोरेशनने कडक कारवाई सुरू केली आहे.
नेपाळला भारतातून पेट्रोल मिळते
नेपाळला भारतातून पेट्रोल पुरविले जाते. दोन्ही देशांमधील जुन्या करारानुसार इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) नेपाळसाठी आखाती देशांकडून पेट्रोल आयात करते. हे पेट्रोल नेपाळला खरेदी केलेल्या किंमतीवर विकले जाते आणि केवळ रिफायनरी फी आकारली जाते. हेच कारण आहे की, नेपाळमध्ये पेट्रोल इतके स्वस्त आहे आणि भारतातील वाढत्या किंमतींमुळे त्याची तस्करी नेपाळमधून सुरू झाली आहे.
त्याचवेळी नेपाळ सीमेला लागून असलेल्या भागातील पेट्रोल पंप मालकांचे म्हणणे आहे की,”नेपाळहून पेट्रोल तस्करीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल विक्रीवर परिणाम होत आहे. मात्र, आता पोलिसही याबाबत सावध झाले आहेत.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.