हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मधील युद्ध सलग सहाव्या दिवशीही सुरूच असून रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीव शहराकडे कूच केली आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेन मधील भारतीय नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत कीव शहर सोडा असे आदेश भारतीय दूतावासाकडून देण्यात आले आहेत.
भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत तातडीनं कीव शहर आजच्या आज सोडून जावं अशा सूचना दूतावासाकडून देण्यात आल्या आहेत. ज्या मिळेल त्या माध्यमातून कीव शहर सोडण्याचं आवाहन भारतीय दूतावासाकडून भारतीय नागरीकांना करण्यात आलं आहे. भारतीय दूतावासानं जारी केलेल्या याच अॅडवायझरीवरुन तेथील परिस्थितीचा अंदाज लावता येऊ शकेल.
आत्तापर्यंत रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या अनेक भागात बॉम्ब हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे कीव राजधानीतील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे रशिया कडून युक्रेन वर अजून जोरदार हल्ले होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कीव शहरातील भारतीयांना कोणत्याही परिस्थितीत शहर सोडण्याचा आदेश दूतवासाने दिला आहे.