खाण्या-पिण्यासाठी नव्हे तर याठिकाणी सर्वाधिक खर्च करतात भारतीय लोक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पैसा कमवणे आणि जगण्यासाठी तो खर्च करणे हे प्रत्येकाच्या आयुष्याचे सर्कल आहे. आपण महिनाभर काम करतो आणि मिळालेल्या पगारातून आपला दैनंदिन खर्च करत असतो. परंतु आपण आपला पैसा कुठे खर्च करतो हे सुद्धा महत्वाचे आहे. राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या (NSO) अहवालानुसार, भारतातील लोक खाण्या-पिण्यावर कमी खर्च करतात, याउलट पडे, मनोरंजन आणि इतर गोष्टींवर जास्त पैसा खर्च केला जात आहे. याबाबतची आकडेवारी सुद्धा समोर आली आहे.

मागील १० वर्षात भारतीय कुटुंबांचा घरगुती खर्च दुपटीने वाढल्याचे या अहवालातून समोर आले आहे. या अहवालात असे दिसून आलं की भारतातील लोक घरातील खाद्यपदार्थांवर कमी खर्च करत आहेत, तर ब्लूमबर्गच्या अहवालात सरकारी आकडेवारीचा हवाला देत असे म्हटले आहे की भारतीय नागरिक नवनवीन कपडे खरेदी करणे, टेलिव्हिजन सेट विकत घेणे आणि मनोरंजनाशी संबंधित वस्तूंवर जास्त खर्च करत आहेत. शहरे आणि खेड्यांमध्ये खाण्या-पिण्यावरील खर्च इतका कमी झाला आहे.

या सर्वेक्षण अहवालात दिलेल्या आकडेवारीची तुलना मागील १० वर्षांपूर्वीच्या आकडेवारी सोबत करण्यात आली आहे. त्यानुसार, ग्रामीण भागातील जनतेच्या एकूण महिन्याच्या खर्चात २०११-१२ साली खाण्यापिण्याचा खर्च हा ५३ टक्के होता, तोच खर्च आता ४६.४ टक्केवर आला आहे. तर शहरी भागाबद्दल सांगायचं झाल्यास, याच काळात शहरी भागांतील नागरिकांच्या महिन्यभराचा एकूण खर्च ४२.६ टक्क्यांवरून ३९.२ टक्क्यांवर आला आहे. जेवणाऐवजी बाकी गोष्टींवर खर्च करण्यात येणारा आकडा शहरात ५७.४ टक्क्यांवरून ६०.८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर हाच आकडा ग्रामीण भागात ४७ टक्क्यांवरून ५३.६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार, ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात शहरी भागातील सरासरी मासिक दरडोई खर्च 2011-12 मध्ये 2,630 रुपये होते, त्यामध्ये वाढ होऊन अंदाजे 6,459 रुपये झाले आहे. याच कालावधीत ग्रामीण भारतात खर्च 1,430 रुपयांवरून अंदाजे 3,773 रुपयांपर्यंत वाढला आहे