भारताची बॉक्सिंगमध्ये कास्य पदकाची कमाई; लवलीनाचा सेमीफायनलमध्ये पराभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासाठी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आजचा अत्यंत महत्वाचा दिवस ठरला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने सेमीफायनलपर्यंत धडक मारली. लवलीना आणि सुरमेनेली यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात दोघींनी अप्रतिम खेळ दाखवला. मात्र, टर्कीच्या बॉक्सरने उत्तम पंचेसच्या मदतीने दुसरा राउंडही जिंकल्याने लवलिनाचा पराभव झाला. तर तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करन्यायासाठी महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेन हि गेली आहे. दरम्यान, आज सेमीफायनल सामना चांगलाच रंगला. सामन्यात दोन्ही बॉक्सरनी उत्तम खेळ दाखवला. पण टर्कीच्या सुरमेनेलीने आपल्या कार्यकर्तृत्व शैलीने खेळ दाखवत सुरुवातीपासून सामन्यावर दबदबा कायम ठेवला. तसेच तिने अचूक पद्धतीने लवलीनाला पंच दिले. अचूक टार्गेट गाठत तिने अधिक गुण मिळवले. त्यामुळे तिन्ही राउंडमध्ये तिने 5-0 ने सामना आपल्या नावे केला.

भारताच्या वतीने पहिल्यांदाच 23 वर्षीय लवलीनाने ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला आहे. तिने आतपर्यत 14 सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे सेमीफायनल जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या टर्कीच्या बुसानाजचा हा 26 वा विजय होता तिने केवळ 6 सामने गमावले आहेत.

Leave a Comment