कोरोनाचा हाहाकार! देशात कोरोनाबाधितांची संख्या ३४ लाखा पार; गेल्या २४ तासात ७६ हजार ४७२ नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयानं वाढ होत आहे. भारतात दरदिवशी ६० ते ७० हजारांच्या वर कोरोनाबाधित आढळत आहेत. मागील २४ तासांमध्ये देशभरात तब्बल ७६ हजार ४७२ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १ हजार २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ३४ लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे.

देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३४ लाख ६३ हजार ९७३ वर पोहचली आहे. यामध्ये ७ लाख ५२ हजार ४२४ अॅक्टिव्ह रुग्ण, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले व करोनातून बरे झालेले २६ लाख ४८ हजार ९९९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ६२ हजार ५५० जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे ६२ हजार ६३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी भारतापेक्षा सर्वाधिक मॅक्सिकोत ६२ हजार ५९४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment