देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८५,३६२ नव्या रुग्णांची नोंद; भारताने ५९ लाखांचा टप्पा ओलांडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाच्या ८५३६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या १०८९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९, ०३,९३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,६०,९६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशातील ४८,४९,५८५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, कोरोनामुळे आतापर्यंत देशातील ९३,३७९ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

साधारण आठवडाभरापूर्वी भारतात प्रत्येक दिवशी ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर बिकट आव्हान निर्माण झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत हा आकडा ९० हजाराखाली आला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही जवळपास तितकेच आहे. याशिवाय कालपर्यंत (२५ सप्टेंबर) देशात एकूण ७,०२,६९,९७५ नमूने तपासण्यात आले. त्यातील १३ लाख ४१ हजार ५३५ नमूण्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment