भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रकृती गंभीर; कोमात गेल्याचे रुग्णालयाने केले स्पष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नसून ते कोमात गेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं आहे. आर्मी रुग्णालयाने ही माहिती दिली. एएनआयने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.

१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. त्याच्या एक दिवस आधीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले आहेत असं आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment