संशोधन क्षेत्रात मोठी प्रगती; भारताने लॉन्च केले चौथे मिसाइल सबमरीन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती साध्य केली आहे. त्यातच भारताने 16 ऑक्टोबरला आण्विक क्षमता मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले असून ,त्यांनी चौथी न्यूक्लियरशस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) लाँच केली आहे . याचे उदघाटन हे विशाखापट्टणमच्या शिप बिल्डिंग सेंटरमध्ये केले असून, ती S4 म्हणून ओळखली जाणार आहे. संशोधन क्षेत्रातील प्रगतीमुळे भारताची ताकद वाढणार आहे.

भारताचे नवीन SSBN

ही नवीन SSBN भारताच्या आण्विक प्रतिरोध क्षमतेत वाढ करणारी ठरली आहे. या सबमरीनमध्ये 75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, के-4 बॅलेस्टिक मिसाइल्ससह सुसज्ज आहे. या मिसाइल्सची रेंज 3500 किमी आहे, जी भारताच्या शत्रू देशांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम ठरू शकते. यामुळे सुरक्षितता वाढणार आहे. याआधीच्या SSBN मध्ये के-15 मिसाइल्स होते, पण नवीव S4 मध्ये फक्त के-4 मिसाइल्स बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे तिची क्षमता जास्त चांगली झाली आहे.

संशोधनामध्ये ताकद वाढवण्याचे उद्दीष्ट

भारताने याआधी 29 ऑगस्ट 2024 रोजी INS अरिघाट ही दुसरी SSBN तसेच नंतर INS अरिधमान नावाची तिसरी SSBN देखील सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून दोन आण्विक-सशस्त्र आक्रमण सबमरीन बांधण्यास देखील सरकारने मान्यता दिली आहे, ज्यामुळे भारताची हिंद प्रशांत महासागरातील उपस्थिती अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल . भारत 2028 पर्यंत रशियाकडून आणखी एक अकुला क्लास न्यूक्लियर सबमरीन लीजवर घेण्याचा विचार करत आहे . या सर्व उपक्रमांमुळे भारताची आण्विक क्षमता आणि हिंद प्रशांत क्षेत्रातील ताकद वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. त्याचबरोबर चीनसारख्या प्रतिस्पर्ध्यांवर दबाव वाढवण्यासाठी ही महत्वाकांक्षी योजना महत्त्वाची ठरणार आहे.