व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला, आजकाल सगळीकडे त्यांची का होते आहे चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सकाळी एचसीएल टेकचे अध्यक्ष शिव नादर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर लगेचच त्यांची मुलगी रोशनी नादर हिच्या हाती एचसीएल टेकचे नेतृत्व आले आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर तिच्याबद्दल सतत चर्चा होत आहे. रोशनी नादर यांची ओळख फक्त एवढीच नाही तर ती देशातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहे.

रोशनी नादर मल्होत्रा ही एचसीएल कॉर्पोरेशनची कार्यकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी ती कंपनीची सीईओ बनली. यासह, ती एचसीएल टेक्नॉलॉजीज बोर्डची उपाध्यक्ष आणि शिव नादर फाऊंडेशनची विश्वस्त देखील आहे.

who is roshni nadar malhotra chairman hcl technologies shiv nadar ...

वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी एचसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या रोशनी नादर मल्होत्रा ​​सांगतात की, यामुळे तिला तिच्या वडिलांसह व्यवसायात बराच वेळ घालविण्याची संधी मिळाली आहे. ती म्हणते की, यामुळे तिला या व्यवसायाची समज आली तसेच वडील शिव नादर यांनाही मदत मिळाली. रोशनी नादर मल्होत्रा ​​ही अनेकदा एचसीएल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय असते.

रोशनी दिल्लीत वाढली आहे. तिने अमेरिकेतील केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर्सची डिग्री घेतली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग इकॉनॉमिक लीडरस् इनिशिएटिव्हमध्येही ती सहभागी झाली आहे.

फोर्ब्सने 2017 ते 2019 पर्यंत जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये रोशनी नादर यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. 2019 मध्ये ती या यादीत 54 व्या स्थानावर होती. सन 2019 मध्ये ती देशातील सर्वात श्रीमंत महिला होती. IIFL Wealth Hurun Indiaच्या म्हणण्यानुसार त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल 31,400 कोटी रुपये इतकी आहे.

 रोशनी दिल्ली में बढ़ी हुई हैं. उनके पास अमेरिका के Kellogg स्कूल ऑफ मैनेजमेंट से बिजनेस एडमिनिस्ट्रेशन में मास्टर्स की डिग्री है. वे वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के यंग ग्लोबल लीडर्स इनिशियेटिव का भी हिस्सा रही हैं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.