हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक सामान्य माणसाची एक ड्रीम लिस्ट असते. आणि त्या ड्रीम लिस्टमध्ये कधीतरी विमानाने प्रवास करावा. हे स्वप्न नक्कीच असते. परंतु विमानाचा प्रवास हा खूप महाग असल्याने प्रत्येकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार ते शक्य होत नाही. परंतु आता विमानाने प्रवास करण्याचे तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. तुम्ही अगदी बसच्या तिकिटात विमानाने प्रवास करू शकता. कारण आता देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने त्यांच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तिकीटांचे दर कमी केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सहजपणे विमानाने प्रवास करू शकता. या कंपनीने जर तुम्हाला देशांतर्गत प्रवास करायचा असेल, तर वनवे तिकीटाची सुरुवात ही 1199 पासून होते. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल, तर ही किंमत 5199 एवढी ठेवण्यात आलेली आहे. तसेच सीट बुक तुम्ही केवळ 99 रुपयांमध्ये करू शकता. त्यामुळे अगदी सर्वसामान्य नागरिकांना देखील आता विमानाने प्रवास करणे शक्य होणार आहे.
इंडिगोने केवळ तिकिटांवर सूट दिली नाही, तर बऱ्याच सेवांवर देखील सूट दिलेली आहे. या प्रीपेड ॲक्सिस बॅगेज वर प्रवाशांना 15% सूट मिळत आहे. तर फास्ट फॉरवर्ड सेवेवर 50% सूट मिळत आहे. तसेच देशांतर्गत जर प्रवास करायचा असेल, तर असिस्टंटसाठी केवळ तुम्हाला 59 रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. जर ही रक्कम तुमच्या आर्थिक बजेटमध्ये बसत असेल, तर तुम्ही नक्कीच विमानाने प्रवास करू शकता.
इंडिगोही आपल्या भारतातील सर्वात कमी खर्चिक अशी एअरलाईन आहे. इंडिगो त्यांच्या प्रवाशांना अगदी कमी दरामध्ये चांगल्या सेवा देत आहे. 2006 मध्ये या कंपनीची स्थापना झालेली, असून हरियाणामध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. ही कंपनी नागरिकांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सेवा देखील पुरवत असते. तसेच प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये, यासाठी देखील ही कंपनी नेहमीच प्रयत्नशील असते. अगदी कमी किमतीमध्ये प्रवाशांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन ही कंपनी येत असते. आणि अशा ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये त्यांनी तिकिटांच्या किंमतीत कमालीची घट केलेली आहे.