Indigo Black Tomato | काळ्या टोमॅटोची शेती करून होईल बंपर कमाई, जाणून घ्या शेती करण्याची पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indigo Black Tomato | शेती हा व्यवसाय अनेक शेतकरी करत असतात. परंतु नेहमीच पारंपारिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांना बऱ्याचदा चांगला फायदा होत नाही. परंतु तुम्ही जर एका त्या गोष्टीच्या बाहेर जाऊन तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असेल, तर तुम्ही या शेती व्यवसायातील आम्ही एक नवीन कल्पना देत आहोत. हा व्यवसाय आता भारतात नवीन आलेला आहे. याची मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आम्ही इंडिगो रोज टोमॅटो शेतीबद्दल सांगणार आहोत.

ती म्हणजे आता लाल टोमॅटोनंतर काळे टोमॅटो ही बाजारात आलेले आहेत. हे टोमॅटो केवळ दिसायलाच वेगळे असून त्याचे गुणधर्म देखील खूप वेगळे आहेत. यांना एक औषधी गुणधर्म आहे. आणि बाजारात देखील या टोमॅटोचे भाव दिवसेंदिवस वाढायला लागलेले आहे. त्यामुळे तुम्ही या टोमॅटोची लागवड करून बंपर कमाई करू शकता.

स्वतःच्या दिसण्यातच एक वेगळी ओळख असणाऱ्या या टोमॅटोकडे लोक उत्सुकतेने नेहमीच पाहत असतात. त्याची खासियत म्हणजे कर्करोगाच्या उपचारात देखील या टोमॅटोचा वापर केला जातो. त्याशिवाय अनेक आजारांशी लढण्यासाठी हे काळे टोमॅटो एक गुणकारी औषध म्हणून वापरले जाते.

काळया टोमॅटोचा इतिहास

काळया टोमॅटोला इंग्रजीमध्ये इंडिगो टोमॅटो असे म्हणतात. त्याची सुरुवात सगळ्यात आधी इंग्लंडमध्ये झाली. त्यामुळे याच्या लागवडीचे श्रेय रे ब्राऊनला जाते. रे ब्राऊनद्वारे काळे टोमॅटो तयार केले. टोमॅटोच्या लागवडीच्या यशानंतर आता भारतातही त्याची लागवड सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे त्याला युरोप बाजारात सुपरफुड असे म्हणतात.

काळा टोमॅटो लागवडीसाठी हवामान कसे लागते

या बियांची लागवड करण्यासाठी इंडिगो रोज रेड आणि पर्पल टोमॅटोच्या बियांचे मिश्रण केले जाते .आणि हे नवीन तयार केले जाते. ज्यामुळे हायब्रीड टोमॅटोचा जन्म होतो. इंग्लंडप्रमाणे भारतातील हवामाना देखील या काळया टोमॅटोच्या उत्पन्नासाठी चांगले आहे. त्यामुळे लाल टोमॅटोप्रमाणे त्याची लागवड केली जाते. या टोमॅटोच्या लागवडीसाठी उष्ण हवामाना असलेले क्षेत्र चांगले असते. थंड ठिकाणी ही झाडे वाढू शकत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणे. खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे याच्या जमिनीचा पीएच व्हॅल्यू सहा ते सात दरम्यान असणे गरजेचे आहे. ही झाडे लाल टोमॅटोच्या झाडांपेक्षा उशिरा उत्पन्न देतात. तसेच याच्या पेरणीचा सर्वोत्तम काळ हा जानेवारी महिना आहे. जेणेकरून एप्रिलपर्यंत ही काळी टोमॅटो येतात.

काळया टोमॅटोची गुणधर्म | Indigo Black Tomato

या काळया टोमॅटोची गुणधर्म म्हणजे ते एक औषधी आहे. ते दीर्घकाळ ताजे ठेवता येते. त्याचप्रमाणे बाजारात लाल टोमॅटोपेक्षा या काळया टोमॅटोला जास्त मागणी आहे. हे टोमॅटो वजन कमी करण्यासाठी, शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधी म्हणून वापरले जाते. हे टोमॅटो बाहेरून जरी काळे दिसत असले तरी आत मधून ते पूर्णपणे लाल असते. ते खाल्ल्यास जास्त आंबट किंवा गोडही नसते तर त्याची सवय साधारण खारट असते.

काळया टोमॅटोची कमाई

या काळा टोमॅटोची लागवड करण्यासाठी जवळपास लाल टोमॅटो एवढाच खर्च येतो. फक्त त्याची बियाणे थोडे जास्त लागतात. काळया टोमॅटोच्या लागवडीचा संपूर्ण खर्च काढल्यानंतर हेक्टरी पाच ते सहा लाख रुपये तुम्हाला मिळू शकता.त्याचप्रमाणे त्याच्या पॅकिंग आणि ब्रॅण्डिंग द्वारे देखील तुम्हाला नफा मिळेल.