इंदिरा गांधी गँगस्टर करीमलाला भेटत असत; हाजी मस्तानच्या मुलाचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीबद्दलचे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी मागे घेतले असतानाच हाजी मस्तानचा दत्तक मुलगा सुंदर शेखरने राऊत यांच्या विधानाला पुष्टी देणारी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. त्यामुळे राऊतांवर टीकेचे बाण सोडणारा महाआघाडीतील घटक पक्ष काँग्रेसची गोची होण्याची शक्यता आहे.

” हाजी मस्तान आणि करीम लाला यांची भेट इंदिरा गांधी घेत असत. इंदिरा गांधी मुंबईत येणार असतील तर करीम लाला यांना दोन दिवस आधीच समजत असे. मी इंदिरा गांधी यांना करीम लाला आणि हाजी मस्तान यांची भेट घेताना पाहिलं आहे. त्यांच्यात काय चर्चा होत होती ते कधी समजलं नाही. कारण मी तेव्हा लहान होतो. मला लांबून सगळं दिसायचं . या तिघांनाही चर्चा करताना मी पाहिलं आहे. ७० ते ८०च्या दशकातली ही गोष्ट आहे. ”

राष्ट्रपती भवनातला फोटो समोर आला आहे. राष्ट्रपती भवनात करीम लाला यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती ही बाबही खरी आहे. करीम लाला आणि हाजी मस्तान या दोघांसोबतही मी राहिलो आहे. मी ब्राह्मण असूनही या दोघांनी मला सांभाळलं असंही सुंदर शेखर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर इंदिरा गांधी मुंबईत येणार असल्या की करीम लाला यांना समजत असे. मी त्यांच्यासोबत गेलोही होतो तेव्हा मी इंदिराजींना पाहिलं आहे असंही सुंदर शेखर यांनी म्हटलं आहे.