Indonesia Ferry Fire : फेरी टॅक्सीला लागली आग!! प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या (Video)

Indonesia Ferry Fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indonesia Ferry Fire । इंडोनेशिया मधून एक भयानक बातमी समोर येत आहे. उत्तर सुलावेसीच्या किनाऱ्याजवळ २८० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या फेरीला आग लागली, आग इतकी भयंकर होती कि प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी थेट समुद्रात उड्या मारल्या. विशेष म्हणजे या फेरी टॅक्सी मध्ये तब्बल २८० पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. सध्या याठिकाणी युध्दवपातळीवर बचावकार्य सुरु असून अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं? Indonesia Ferry Fire

याबाबत अधिक माहिती अशी किम, केएम बार्सिलोना ५ असे सदर आग लागलेल्या फेरी टॅक्सीचे नाव आहे. हे जहाज तलौद बेटांवरून मानाडोला जात होते, मात्र त्याच दरम्यान, तालिसेई बेटाजवळ या फेरी टॅक्सीला आग लागली. स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.०० वाजता हि आग (Indonesia Ferry Fire) लागली. फेरीच्या वरच्या डेकवर आगीच्या ज्वाळा वेगाने पसरत गेल्या. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि घबराटीचे वातावरण पसरलं. अनेक प्रवाशांनी आगीपासून सुटका करण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या. याबाबतचा एक विडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. आकाशात काळे धुराचे सावट पसरल्याचे आणि घाबरलेले प्रवासी ओरडताना आणि समुद्रात उड्या मारताना यामध्ये दिसत आहेत.

असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे आणि २८४ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले आहे. मासेमारी नौका, स्थानिक स्वयंसेवक आणि अधिकृत बचाव जहाजे यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे. त्यासाठी शोध आणि बचाव पथकांनी लिकुपांग बंदराजवळ तळ उभारला आहे.

इंडोनेशियन फ्लीट कमांडचे कमांडर व्हाइस अॅडमिरल डेनिह हेंद्राटा यांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत २८४ प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे, अजूनही लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र जहाजात असलेल्या प्रवाशांची नेमकी संख्या अजूनही अस्पष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. हि आग (Indonesia Ferry Fire) का आणि कशी लागली याची आता चौकशी करण्यात येईल असं डेनिह हेंद्राटा यांनी सांगितलं.