‘मी राहुल गांधींची होणारी बायको असून मला अडवू नका, जाऊ द्या!’ सांगत महिलेने घातला एअरपोर्टवर गोंधळ

इंदूर । मध्य प्रदेशच्या इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इंदूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने आपल्याला विमानतळावर विनातिकीट प्रवेश देण्याची मागणी करत जोरदार गोंधळ घातला. कमालीची बाब म्हणजे, या महिलेने मी राहुल गांधींची होणारी पत्नी असल्याचे सांगत मला दिल्लीला जाऊ द्या असं सांगत विमानतळावरील सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचं तिकीट नसतानाही एक महिला विमानतळावर आपल्याला प्रवेश देण्यात यावा यासाठी सुरक्षारक्षकांसोबत वाद घालत होती. सुरक्षारक्षकांनी तिला थांबवलं तेव्हा ही महिला सुरक्षारक्षकांनाच धमकी देऊ लगाली. मी राहुल गांधींची होणारी पत्नी आहे असं तिने सांगितलं. याशिवाय राहुल गांधी मला भेटायला येत नाहीत म्हणून मीच त्यांना भेटायला दिल्लीला जात आहे. मला त्यांच्याशी लग्न करायला जायचं आहे. जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुम्ही सर्वजण मला सलाम कराल असंही ही देखील महिलेने सुरक्षारक्षकांना म्हटलं आहे.

सुरक्षारक्षकांनी महिलेला बराच वेळ समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिलेने गोंधळ सुरूच ठेवला. अखेर पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता ती महिला परदेशीपूरा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता चौकशीमध्ये ही महिला मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळाली. गेल्या काही दिवसांपासून ही महिला आपल्या घरातून पळून जात असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. अनेकदा ही महिला घरातून पळून जाते आणि बाहेरच्या लोकांशी कोणत्याही कारणावरुन वाद घालत असल्याचं समोर आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like