इंद्राणी मुखर्जीचा वैद्यकीय कारणासाठीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालत दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | संपत्तीच्या हव्यासापोटी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. इंद्राणी मुखर्जी यांनी याच संपत्तीसाठी आपल्या मुलीचा जीव घेतला, असा आरोप त्यांच्यावर आहे. आता आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी आरोग्याच्या कारणासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. पण त्याला सीबीआयने विरोध दर्शवला आहे.

शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी या मुख्य आरोपी आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुखर्जी यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. इंद्राणी मुखर्जीने वैद्यकीय कारणासाठी जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर, सीबीआयने या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी आठवड्याचा वेळ मागून घेतला. यामुळे सुनावणी 22 फेब्रुवारी पर्यंत गेली. सोबतच इंद्राणीने सर्व वैद्यकीय अहवाल भायखळा जेल प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर हे प्रकरण आहे.

शीना बोरा यांचा एप्रिल 2012 मध्ये खून झाला होता. या खुणामध्ये शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी ही मुख्य आरोपी होती. इंद्राणी मुखर्जी यांचा ड्रायव्हर श्याम याने बेकायदा शस्त्र बाळगले असल्यामुळे अटक केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर इंद्राने तिचे पती पीटर मुखर्जी यांनाही खुनाच्या कटामध्ये सहभागी करून घेतल्याची कबुली दिली होती. सध्या पिटर मुखर्जी जामिनीवरती आहेत. तर इंद्राणी मुखर्जी यांनी सहा वेळा जामीन अर्ज केला आहे व कोर्टाने तो प्रत्येकवेळा फेटाळला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment