महिला राखीव गटातून सहकार पॅनेलच्या इंदुमती जाखले, जयश्री पाटील 5 हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या महिला राखीव गटात दोन जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या नेर्ले येथील इंदुमती दिनकर जाखले यांनी 5 हजार 280 तर बहे येथील जयश्री माणिकराव पाटील यांनी 5 हजार 238 मतांची आघाडी घेतली आहे.

कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत महिला राखीव गटाचा पहिल्या फेरीतील जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण 17 हजार 295 मतापैकी 16 हजार 876 मध्ये वैद्य ठरली आहेत. तर 419 मते अवैद्य ठरलेली आहेत.

पहिल्या फेरीत फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल इंदुमती दिनकर जाखले (नेर्ले) 9 हजार 744 तर जयश्री माणिकराव पाटील 9 हजार 973, संस्थापक पॅनेल मीनाक्षीदेवी संभाजी दमामे (बहे) 4 हजार 464 तर उमा अजित देसाई (काले) 4 हजार 635, रयत पॅनेल उषा संपतराव पाटील (शेरे) 2 हजार 64 सत्वशीला उदयसिंह थोरात (बहे) 2 हजार 609 अशी मते असून अपक्ष कांचनमाला जगताप यांना 45 मते मिळाली असून अद्याप दुसरी फेरीची मतमोजणी बाकी आहे.

Leave a Comment