इंडियाबुल्सने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्या बंगल्याचा 114 कोटी रुपयांमध्ये केला लिलाव

नवी दिल्ली । येस बँकेचे (Yes Bank) सह-संस्थापक राणा कपूर ( Rana Kapoor) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्याच्या दिल्लीस्थित बंगल्याचा लिलाव इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सने (Indiabulls Housing Finance) 114 कोटी रुपयांमध्ये केला आहे. इंडियाबुल्सने ब्लिस व्हिला (Bliss Villa) साठी लोन दिले होते. याची हमी राणा कपूर यांची होती. ही प्रॉपर्टी दिल्लीच्या कौटिल्य मार्कवर आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, या प्रकरणाची माहिती असलेले तीन लोकं म्हणाले की, “इंडिया बुल्सने दिल्लीस्थित रिअल इस्टेट डेव्हलपरला 114 कोटी रुपयांना विकले होते.”

1235 चौरस यार्डात बांधला बंगला
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राच्या वृत्तानुसार वृत्तपत्राने असे म्हटले आहे की, इंडियाबुल्सने यावर्षी जानेवारीत ही प्रॉपर्टी ताब्यात घेतली होती. राणा कंपनीसाठी 83.43 कोटी, 69.88 कोटी आणि 86.56 कोटी रुपयांची तीन कर्जे डिफॉल्ट केली होती. राणांचा हा बंगला 1235 चौरस यार्डात बनविण्यात आला आहे. यात तळ मजल्याव्यतिरिक्त आणखी दोन मजले आहेत.

ईडीने ही 792 कोटींची संपत्ती जप्त केली
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राणा कपूरची 792 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. राणाच्या दक्षिण मुंबईत अनेक अपार्टमेंटस् आणि इंडिपेंडेंट रेसिडेंशियल बिल्डिंग आहेत. मात्र, या संदर्भात इंडियाबुल्स हाऊसिंगने वर्तमानपत्राला कोणतेही उत्तर दिले नाही. राणा कपूरची मुलगी राधानेही या प्रकरणाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. राणा कपूरला गेल्या वर्षी मार्चमध्ये ईडीने अटक केली होती आणि सध्या ते नवी मुंबईतील तळेजा जेलमध्ये आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राणा कपूर, त्यांची पत्नी आणि तीन मुलींची चौकशी ईडी करीत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार कपूर ने येस बँक चालवत असताना चुकीच्या पद्धतीने कर्जे वाटून त्यांनी 4300 कोटी रुपयांचा फायदा मिळविला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like