84 हजार ग्राहकांना मंजुरीशिवाय कर्ज दिल्याप्रकरणी Induslnd Bank चे स्पष्टीकरण, व्हिसलब्लोअरचा दावा खोटा असल्याचे म्हटले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । खाजगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेने ‘कर्ज एव्हरग्रीनिंग’ वरील व्हिसलब्लोअरचे क्लेम पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. मे महिन्यात तांत्रिक बिघाडामुळे 84 हजार ग्राहकांना त्यांच्या संमतीशिवाय कर्ज दिल्याचे बँकेने शनिवारी मान्य केले.

‘लोन एव्हरग्रीनिंग’ म्हणजे थकीत कर्जाचे रिन्यूअल करण्यासाठी फर्मला नवीन कर्ज देणे. इंडसइंड बँकेने स्पष्ट केले की, फील्ड कर्मचार्‍यांनी ग्राहकांना दोन दिवसांच्या आत संमतीशिवाय कर्ज देण्याबद्दल माहिती दिली होती, त्यानंतर ही त्रुटी त्वरित दुरुस्त करण्यात आली.

एका मीडिया रिपोर्टनुसार, अज्ञात व्हिसलब्लोअरने बँक मॅनेजमेंट आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ला इंडसइंड बँकेची उपकंपनी असलेल्या BFIL द्वारे देण्यात आलेल्या एका पात्राबाबत लिहिले आहे ज्यामध्ये काही अटींसह दिलेल्या कर्जाचे रिन्यूअल केल्याचा आरोप आहे. अशाप्रकारे, जेथे सध्याच्या ग्राहक कर्जाची परतफेड करू शकत नव्हते, त्यांना नवीन कर्ज देण्यात आले, जेणेकरून खातेपुस्तके स्वच्छ ठेवता येतील.

लोन एव्हरग्रीनिंग झाल्याचा आरोप बँकेने फेटाळून लावला
या आरोपांवर बँकेने म्हटले आहे की,”आम्ही लोन एव्हरग्रीनिंगचे आरोप पूर्णपणे नाकारतो. BFIL द्वारे जारी केलेली आणि व्यवस्थापित केलेली कर्जे नियामकाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतरच वितरित केली जातात. यामध्ये कोविड-19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या उद्रेकादरम्यान दिलेल्या कर्जाचाही समावेश आहे.

बँकेने सांगितले की,”मे 2021 मध्ये तांत्रिक त्रुटींमुळे सुमारे 84,000 ग्राहकांना परवानगीशिवाय कर्ज देण्यात आले.”

Leave a Comment