IndusInd Bank Scam : बँकेच्या तक्रारीवर कार्वीचे राजीव रंजन आणि जी. कृष्णा हरीला अटक, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इंडसइंड बँक घोटाळ्या (IndusInd Bank Scam) प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी Karvy Stock Broking Pvt Ltd च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. इंडसइंड बँकेने दोन्ही अधिकाऱ्यांवर ग्राहकांच्या सिक्युरिटीज (Clients Securities) तारण ठेवून बँकांकडून घेतलेल्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या तक्रारीच्या आधारे कार्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजीव रंजन सिंग आणि मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) जी. कृष्णा हरी यांना अटक करण्यात आली आहे.

सेबीने 2019 मध्ये नवीन ग्राहक घेण्यावर घातली होती बंदी
हैदराबाद पोलिसांनी यापूर्वीच कार्वीचे अध्यक्ष सी. पार्थसारथी यांना इंडसइंड बँकेला 137 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याच्या (Loan Default) आरोपाखाली अटक केली होती. भांडवली बाजार नियामक सेबीने नोव्हेंबर 2019 मध्ये कार्वीला नवीन ब्रोकरेज क्लाइंट घेण्यास मनाई केली होती. खरं तर, यापूर्वीच असे आढळून आले की, ब्रोकरेज फर्मने ग्राहकांच्या सिक्युरिटीजच्या 2,000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार केला आहे.

BSE – NSE नेही डिफॉल्टर घोषित केले आहे
Bombay Stock Exchange ने नोव्हेंबर 2020 मध्ये कार्वी स्टॉक ब्रोकिंगला डिफॉल्टर म्हणून घोषित केले होते. यानंतर, National Stock Exchange नेही अशीच कारवाई सुरू केली. यानंतर त्यांनी ब्रोकरेज कंपनीचे सदस्यत्वही काढून घेतले होते.

Leave a Comment