Infinix Hot 40i : Infinix लाँच केलाय स्वस्तात मस्त मोबाईल; 32 MP सेल्फी कॅमेरा अन बरंच काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Infinix Hot 40i : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Infinix ने भारतात आपला नवा मोबाईल लाँच केला आहे. Infinix Hot 40i असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की या मोबाईलचा सेल्फी कॅमेरा HD दर्जाचे व्हिडिओ कॅप्चर करू शकतो. आज आपण Infinix च्या या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात….

6.6 इंचाचा डिस्प्ले – Infinix Hot 40i

Infinix Hot 40i मध्ये कंपनीने 90Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा HD+ पंच होल डिस्प्ले दिला आहे. या मोबाईल मध्ये UniSoc T606 प्रोसेसर बसवण्यात आला असून आयफोन 15 सारखे डायनॅमिक आयलंड फीचर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. कंपनीने मोबाईलला IP53 रेटिंग दिले आहे. मोबाईलच्या स्टोरेजबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज दिले आहे. व्हर्च्युअल रॅमद्वारे तुम्ही 8GB रॅम १६ GB पर्यंत वाढवू शकता.

मोबाईलच्या कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, Infinix Hot 40i च्या पाठीमागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्राथमिक कॅमेरा सेन्सर आणि दुय्यम कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 18W USB Type C चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईलच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये फेस अनलॉक, चार्जिंग ॲनिमेशन, चार्ज रिमाइंडर, बॅकग्राउंड कॉल मॅजिक रिंग यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

किंमत किती?

Infinix Hot 40i च्या 8GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. 21 फेब्रुवारी रोजी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा स्मार्टफोन पाम ब्लू, स्टारफॉल ग्रीन, होरायझन गोल्ड आणि स्टारलिट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.