हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर कमी किमतीत आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे, कारण मोबाईल निर्माता ब्रँड Infinix भारतीय बाजारात आपलाInfinix Hot 50 5G नावाचा मोबाईल लाँच केला आहे. या स्मार्टफोन मध्ये 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. खास बाब म्हणजे हा मोबाईल खूपच स्लिम असून हाताळायला सुद्धा चांगला फील देईल. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
6.7 इंचाचा डिस्प्ले –
Infinix Hot 50 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये पंच-होल डिझाइन आणि 93.9 टक्के स्क्रीन ते बॉडी रेशो मिळतो. इनफिनिक्सच्या या मोबाईलची जाडी अवघी 7.8mm आहे म्हणजेच दिसायला हा स्मार्टफोन अतिशय स्लिम आहे. कंपनीने मोबाईल मध्ये MediaTek Dimensity 6300 5G प्रोसेसर बसवला असून 4GB/8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजचा वापर करता येतोय. हे स्टोरेज तुम्ही मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवू शकता. इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित XOS वर काम करतो.
कॅमेरा – Infinix Hot 50 5G
आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या कॅमेराचा,,,, तर Infinix Hot 50 5G च्या पाठीमागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 48MP मुख्य कॅमेरा आणि 8MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W USB Type C चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती?
या मोबाईलच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हॅरियंटची किंमत 9,999 रुपये आहे तर 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हॅरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. पहिल्या सेलमध्ये 1,000 रुपयांचा झटपट बँक डिस्काउंट ग्राहकांना मिळतोय. हा मोबाईल पर्पल, निळा, काळा आणि हिरव्या रंगात उपलब्ध आहे.