आता मॅगी, चॉकलेट, कॉफीलाही महागाईचा विळखा; ‘ही’ कंपनी वाढवणार किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई सर्वसामान्यांना झटका देत आहे. एकीकडे घरांच्या किंमती वाढत आहेत तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर जनतेच्या खिशाची लूट करत आहेत. आता तर खाद्यपदार्थही आता लोकांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत. परिस्थिती अशी आहे की, किरकोळ महागाईने RBI ने ठरवून दिलेले 6 टक्क्यांचे अप्पर टार्गेट ओलांडले आहे.

आगामी काळात महागाई आणखीनच वाढणार आहे. दोन मिनिटांत बनवल्या जाणाऱ्या मॅगी आणि चॉकलेटवरही महागाई हळूहळू परिणाम करू लागली आहे. आता कॉफीवरही त्यांची नजर असून किटकॅट आणि नेसकॅफे निर्माते नेस्ले लवकरच आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवणार आहे.

ग्राहकांवर बोझा
नेस्लेने आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा इशारा दिला आहे. नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन म्हणतात की,” अन्न आणि वस्तूंची वाढती महागाई ही चिंतेची बाब आहे. ज्यामुळे कंपनीला आता त्याची किंमत कमी करण्यासाठी ग्राहकांवर काही प्रमाणात बोझा टाकायचा आहे. त्यामुळे आता भाव वाढवणे गरजेचे झाले आहे.”

किंमती 3.1 टक्क्यांनी वाढू शकतात
नेस्लेने म्हटले आहे की, वाढत्या परिचालन खर्चाची भरपाई करण्यासाठी ते आर्थिक परिणामांपूर्वीच किंमती 3.1 टक्क्यांनी वाढवू शकतात. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये इनपुट कॉस्ट आणखी वाढेल. अशा स्थितीत त्यांच्याकडे दरवाढ करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कच्चा माल, ऊर्जा आणि कामगारांच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादनांच्या किंमती वाढण्याचा इशारा कंझ्युमर गुड्स कंपन्यांनी याआधीच दिला आहे.”

विक्रीचे चांगले आकडे
नेस्लेच्या मते, गेल्या वर्षी एकूण विक्रीत 3.3 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत निव्वळ नफ्यात 38.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महामारीच्या काळात कॉफी, घरगुती उत्पादने आणि हेल्दी फूड प्रोडक्ट्सच्या विक्रीत वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

विक्रमी महागाई
अमेरिकेतील महागाईने 40 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. यूएस फेडरल रिझर्व्ह देखील व्याजदर वाढवणार आहे. त्याचप्रमाणे, यूकेमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये 5.5 टक्क्यांवर पोहोचला, जो 30 वर्षांचा उच्चांक आहे. आगामी काळात महागाई 2 टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज बँक ऑफ इंग्लंडने व्यक्त केला आहे.

Leave a Comment