महागाईवर लवकरच नियंत्रण येईल ! अन्नधान्य, तेलबिया आणि कडधान्यांचे विक्रमी उत्पादन अपेक्षित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2021-22 या वर्षासाठीचा अन्नधान्य उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. मंत्रालयाचा अंदाज आहे की, यावेळी देशात 31.60 कोटी टन विक्रमी अन्नधान्याचे उत्पादन होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 53 लाख टन जास्त असेल. 2020-21 मध्ये 31.07 कोटी टन अन्नधान्याचे उत्पादन झाले.

यावेळी तेलबिया आणि कडधान्यांचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. जास्त उत्पादनामुळे डाळी आणि मोहरीच्या तेलाच्या किंमती कमी होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळू शकेल. मंत्रालयाच्या मते, 2021-22 या वर्षातील उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा 25.3 कोटी टन जास्त असण्याची शक्यता आहे.

तांदूळ आणि गहू भरपूर असतील
2021-22 मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन विक्रमी 12.79 कोटी टन असल्याचा अंदाज आहे आणि हे गेल्या पाच वर्षांतील सरासरी 11.64 कोटी टन उत्पादनापेक्षा 1.15 कोटी टनांनी जास्त आहे. 2021-22 या वर्षात गव्हाचे एकूण उत्पादन 11.13 कोटी टन विक्रमी असल्याचा अंदाज आहे. हे पाच वर्षांच्या सरासरी 10.39 कोटी टन उत्पादनापेक्षा 74.4 लाख टन जास्त आहे. त्याचप्रमाणे भरड तृणधान्यांचे उत्पादन 4.98 कोटी टन असल्याचा अंदाज आहे, जे सरासरी उत्पादनापेक्षा 32.8 लाख टन जास्त आहे.

कडधान्ये आणि तेलबियांचेही जोरदार उत्पादन झाले
2021-22 या वर्षात एकूण 2.69 कोटी टन कडधान्य उत्पादनाचा अंदाज आहे, जे गेल्या पाच वर्षांतील 2.38 कोटी टनांच्या सरासरी उत्पादनापेक्षा 31.4 लाख टन जास्त आहे. यावेळी तेलबिया उत्पादनात मागील सर्व विक्रम मोडीत निघण्याची अपेक्षा आहे. मंत्रालयाने 2021-22 मध्ये देशातील एकूण तेलबियांचे उत्पादन 3.71 कोटी टन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जे 2020-21 या वर्षातील 3.59 कोटी टन उत्पादनापेक्षा 12 लाख टन जास्त आहे.

ऊस आणि कापूसही जास्त असेल
2021-22 या वर्षात देशातील उसाचे उत्पादन 41.40 कोटी टन असल्याचा अंदाज आहे, जे सरासरी 37.34 कोटी टन ऊस उत्पादनापेक्षा 4.06 कोटी टन जास्त आहे. कापूस उत्पादन 3.40 कोटी गाठी (प्रति 170 किलो) अंदाजित आहे, जे सरासरी उत्पादन 3.29 कोटी गाठीपेक्षा 11.2 लाख गाठी जास्त आहे. ताग आणि मेस्ताचे उत्पादन 95.7 लाख गाठी (प्रति 180 किलो) असल्याचा अंदाज आहे.

Leave a Comment