Inflation : होम लोनपासून ते इन्शुरन्सपर्यंत जूनमध्ये ‘या’ गोष्टींसाठी मोजावे लागणार जास्त पैसे !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Inflation : 1 जून पासून सर्वसामान्यांना महागाईची आणखी झळ सोसावी लागणार आहे. यामागील कारण असे की, जूनपासून अनेक आर्थिक बदल होणार आहेत. याचा परिणाम आपल्या खिशावर होईल. जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक किंवा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेदार असाल तर आपल्या बजटमध्ये नक्कीच गडबड होईल. तसेच बँकांव्यतिरिक्त, थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्ससाठी देखील थोडे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Nigeria & UK: Two opposing inflation problems - Nairametrics

चला तर मग 1 जून 2022 पासून असे कोणते बदल होणार आहेत, ज्याचा थेट तुमच्या बजटवर परिणाम होईल… त्याविषयी जाणून घेऊयात-

SBI होम लोनवरील उच्च व्याजदर

एका बातमीनुसार, SBI ने होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (EBLR) 40 बेस पॉईंट्सने 7.05 टक्क्यांनी वाढवला आहे आणि रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.65 टक्के होईल. + CRP. 1 जून 2022 पासून हे वाढलेले व्याजदर लागू होतील.

EBLR ची गणना केली जाते- बाह्य बेंचमार्क आधारित कर्ज दर (EBLR) = बाह्य बेंचमार्क दर (EBR) + क्रेडिट जोखीम प्रीमियम (CRP). Inflation

SBI SCO Recruitment 2021: SBI Releases Interview Schedule on sbi.co.in |  Here's How to Download

एक्सिस बँकेच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ

एक्सिस बँकेने पगार आणि बचत खातेधारकांसाठीच्या सर्व्हिस चार्जमध्ये वाढ केली आहे. बँकेने एव्हरेज मंथली बॅलन्स (AMB) चे कमीत कमी लिमिट 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केले आहे. जर हे मेंटेन केले गेले नाही किमान सर्व्हिस चार्ज झिरो असेल.

Axis Bank to Take Over Citi India's Retail Business for $2 Billion;  Announcement Today

दुचाकी वाहनांसाठी मोटार विमा प्रीमियम

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घोषित केल्यानुसार वाहनांच्या विविध कॅटेगिरी साठीच्या थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ झाली आहे. 1 जून 2022 पासून, 150cc ते 350cc पर्यंतच्या मोटारसायकलसाठी आता 1,366 रुपये इन्शुरन्स प्रीमियम द्यावा लागेल, तर 350cc पेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकींसाठी सुधारित केलेला इन्शुरन्सचा प्रीमियम रुपये 2,804 असेल. 75cc ते 150cc पर्यंतच्या वाहनांसाठीचा 714 रुपये इन्शुरन्स प्रीमियम असेल तर 75cc पेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकींसाठी 538 रुपयांचे थर्ड पार्टी कव्हर घेतले जाऊ शकते. Inflation

चारचाकी वाहनांसाठी इन्शुरन्स प्रीमियम

1000cc पर्यंतच्या इंजिन क्षमतेच्या कारसाठीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 2,094 रुपये असेल. कोविडच्या आधी (2019-20 मध्ये) तो 2,072 रुपये होता. त्याच वेळी, 1000cc ते 1500cc कारसाठीचा इन्शुरन्स प्रीमियम आता 3,416 रुपये असेल, जो पूर्वी 3221 रुपये होता. थोडक्यात सांगायचे झाले तर आता वाहनांचा इन्शुरन्स महागणार आहे. Inflation

India Post Payments Bank Revises Doorstep Banking Charges, Interest Rates |  Mint

इंडिया पोस्ट पेमेंट बँक

इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने आधार बेस्ड पेमेंट सिस्टीम सर्व्हिस चार्ज (AePS) सुरू केले आहे. 15 जून 2022 पासून हे AePS इश्युअर ट्रान्सझॅक्शन चार्ज लागू होईल. यामध्ये कॅश काढणे, कॅश डिपॉझिट्स आणि मिनी स्टेटमेंट सारखे पहिले तीन AePS इश्युअर ट्रान्सझॅक्शन दर महिन्याला फ्री मिळतील. त्याच वेळी, या लिमिट पेक्षा जास्त कॅश काढण्यासाठी आणि कॅश जमा करण्याच्या प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी 20 रुपये + GST ​​आणि मिनी स्टेटमेंटच्या प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी 5 रुपये + GST ​​द्यावा लागेल. Inflation

अधिक माहिती साठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ippbonline.com/

हे पण वाचा :

Aadhar Card चा गैरवापर टाळण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती !!!

Interest Rates : आता ‘या’ फायनान्स कंपनीकडून आपल्या FD वरील व्याजदरात वाढ !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजचे नवीन दर पहा

उद्धव ठाकरे हेच पुढची 25 वर्ष मुख्यमंत्री असतील; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ विधानावर राऊतांची प्रतिक्रिया

Aadhar Card चा गैरवापर टाळण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती !!!

 

Leave a Comment