हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार सतत नवनवीन योजनांची अंमलबजावणी करत असते. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन (Gandhi National Widow Pension) योजना होय. ही योजना विधवा महिलांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना आर्थिक सहाय्यक सरकार करते. त्यामुळे या योजनेचा लाभ विधवा महिलांनी कशा पद्धतीने घ्यावा याची माहिती जाणून घ्या.
योजनेचे उद्दिष्ट काय?
आपल्या राज्यामध्ये अनेक विधवा महिला आहेत. या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे अशा महिलांना आर्थिक सहाय्य राज्य सरकार इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत करत आहे. विधवा महिलांना सक्षम बनवणे, आत्मनिर्भर बनवणे, त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास करणे, त्यांचे जीवनमान सुधारवणे हा या योजनेमागील मुख्य हेतू आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील विधवा महिलांना पेन्शनची रक्कम देण्यात येते.
कागदपत्रे कोणती लागतात?
मुख्य म्हणजे या योजनेचा लाभ फक्त 40 ते 70 वयोगटातील विधवा महिलांना घेता येऊ शकतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी
आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो, पतीचा मृत्यु दाखला अशा कागदपत्रांची आवश्यकता असते. हा अर्ज भरून मंजूर झाल्यास महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात.
अर्ज करायचा कोठे?
योजनेचा अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतु केंद्राला भेट द्यावी. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी , https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate या वेबसाईटला भेट द्यावी.