नारायण मूर्तींकडून मोठी घोषणा ; इन्फोसिसचे कर्मचारी होणार मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयटीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे . कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपनीपैकी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कर्मचाऱ्यांसाठी 90% सरासरी कामगिरी बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच हा बोनस नोव्हेंबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार असल्यामुळे , कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कंपनीचे महत्वाचे पाऊल –

डिलिव्हरी आणि सेल्स यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीने पात्र कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवलेला असून , त्यामध्ये त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. या मेलमध्ये तुमच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आमचे उद्योगातील नेतृत्व आणखी मजबूत झाले आहे , असे लिहण्यात आले आहे.

कोणाला भेटणार बोनस –

हा बोनस E6 स्तरावरील आणि त्याखालील कर्मचाऱ्यांसाठी मिळणार असल्याचे , कंपनीने स्पष्ट केले आहे. E0 ते E2 यामध्ये फ्रेशर्सपासून तांत्रिक कर्मचारी येतात. तसेच E3 ते E6 मध्ये मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश असतो . E7 आणि त्यापुढील वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना हा बोनस लागू होणार नाही.

आर्थिक कामगिरीतील प्रगती –

इन्फोसिसने जुलै-सप्टेंबर 2024 या दुसऱ्या तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 4.7% वाढून 6506 कोटी रुपये पर्यंत पोहचला आहे. तसेच महसूल 5.1% ने वाढून 40986 कोटी रुपये झाला आहे. वित्तीय सेवा क्षेत्रातील वाढती मागणी आणि मोठ्या करारांमुळे कंपनीला हा फायदा झाला आहे. कंपनीच्या या फायद्यामध्ये कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्यामुळे , इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी निवडक कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2025 पासून पगारवाढ लागू करण्याचे जाहीर केले आहे . हि पगारवाढ एप्रिल 2025 पासून सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे.

कंपनीची विश्वासार्हता –

इन्फोसिसच्या या निर्णयामुळे कर्मचारी संतुष्टी वाढण्याबरोबरच कंपनीची बाजारपेठेतील विश्वासार्हता टिकून राहणार आहे. कठोर मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रोत्साहन देण्याचा कंपनीचा हा चांगला प्रयत्न आहे.