हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अनेक दिवसापासून आपल्या आपण भारतातून अनेक आयटी कंपन्या बंद झाल्याच्या किंवा कामगारांना कामावरून काढून टाकल्याच्या बातम्या ऐकलेल्या आहे. त्यामुळे अनेक इंजिनियर्स सध्या बेरोजगार घरी बसलेले आहेत. अशातच आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आयटी क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे आहे. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. भारतातील आयटीआय कंपन्या लवकरच आता फ्रेशर्सला नोकरीची संधी देणार आहेत. आणि त्यांच्याकडून कॅम्पस कॅम्पस इंटरव्यू घेण्यास देखील सुरुवात झालेली आहे. आयटी कंपन्या या क्लाऊड कम्प्युटिंग डेटा आणि AI क्षेत्रात ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना संधी देत आहेत.
आयटी (IT) क्षेत्रातील अनेक कंपन्या या भरती प्रक्रिया बाबत घेणार आहेत. त्यामध्ये सध्या आयबीएम इनफॉईसिस टीसीएस, एलटीआय माईंडट्री या कंपन्या लवकरच कॅम्पस इंटरव्यू घेणार आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नामांकित कॉलेजला भेट देखील दिलेली आहे. आणि त्यांची निवड प्रक्रिया देखील होणार आहे.परंतु या आयटी कंपन्या केवळ काही निवडक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देणार आहे. या फ्रेशर्स विद्यार्थ्यांना 6 ते 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिलेली दिले जाणार आहे. अशी माहिती या कंपन्यांनी जाहीर केलेली आहे.
येत्या वर्षात जुलै महिन्यापासून हे कॅम्पस इंटरव्यू घेतले जाणार आहेत. आणि अनेकांना यातून नोकरीची संधी मिळणार आहेत. या भरतीमध्ये टीसीएस कंपनीकडून 40 हजार जागा, इन्फोसिस कंपनीकडून 20000 तर विप्रो कंपनीकडून 10 हजार उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. या कंपन्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. आणि आता एक वर्षानंतर पुन्हा एकदा कॅम्पस हायरिंग चालू होणार आहे. या हायरिंग मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची मर्यादा ही 60 टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे. त्यामुळे आता सध्या जे आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. त्यांना इंटरव्यूसाठी इतर कुठेही जायची गरज नाही. त्यांचे कॅम्पस इंटरव्यू कॉलेजमधूनच त्यांची निवड होणार आहे.