Sunday, April 2, 2023

भाजप युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून बेदम मारहाण; पहा Video

- Advertisement -

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जालना शहरातील लोधी मोहल्ल्यातील भाजपा युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्या तरुणाला जनावरासारखी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. यामुळे संपूर्ण जालना शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जालना येथील लोधी मोहल्ल्यातील भाजपा युवामोर्चाचा पदाधिकारी शिवराज नारियलवाले यांना जालन्यातील दिपक हॉस्पिटलमध्ये काही पोलिसांनी साखळी करून लाथा-बुक्क्या, लाठीचार्ज करून जनावरसारखी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता.

- Advertisement -

यामध्ये तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह 12 ते 13 पोलिसांनी घेरून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्व सामान्य लोकांकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या मारकुट्या पोलीस अधिकारी व पोलिसांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या मारहाणीमध्ये शिवराज नारियलेवाले यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या.