उपचारासाठी चक्क पिल्लाला घेऊन रुग्णालयात पोहोचलं माकड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमधील सासाराम येथील एका खासगी दवाखान्यात एक वेगळी घटना पाहायला मिळाली. सामान्यत: क्लिनिकमध्ये आपण फक्त मानवी रुग्ण येतात, मात्र यावेळी एक जखमी मादी माकड आपल्या बाळासह क्लिनिकमध्ये उपचारासाठी आली. ती जेव्हा रुग्णालयात आली तेव्हा माकडाच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि तिच्या बाळाला पायाला दुखापत झाली होती. मादी माकड आपल्या बाळाला छातीला बिलगून क्लिनिकसमोर थांबली आणि तिला आत यायचं आहे, असे हातवारे करून तिने डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न केला.

शाहिजुमा परिसरातील एमएस क्लिनिकमध्ये डॉक्टर अहमद उपस्थित होते. त्यांनी मादी माकडाचे हावभाव समजून घेतले आणि लोकांना माकडासाठी तिथे जागा तयार करण्यास सांगितले. यादरम्यान मादी माकड आपल्या पिल्लाला छातीशी धरून क्लिनिकमध्ये आले आणि बाकावर बसले. यानंतर डॉ.अहमद यांनी माकड आणि तिच्या बाळावर उपचार सुरू केले. त्यांनी सर्वप्रथम माकड आणि तिच्या बाळाच्या जखमा स्वच्छ केल्या आणि नंतर त्यावर मलम लावले. यानंतर डॉ. अहमद यांनी दोघांना धनुर्वाताचं इंजेक्शनही दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

उपचारानंतर, डॉ अहमद यांनी क्लिनिकमध्ये आलेल्या इतर रुग्णांना जागा रिकामी करण्यास सांगितले जेणेकरून मादी माकड आपल्या बाळासह आरामात बाहेर जाऊ शकेल. लोक बाजूला झाल्यानंतर मादी माकड आपल्या पिल्लाला घेऊन शांतपणे तिथून निघून गेली. या घटनेमुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

हे पण वाचा :
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!

हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी???

रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Leave a Comment