भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना झाले आहेत. राजनाथ सिंह हे आजपासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. चीनसोबतचे संबंध ताणल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. भारताला रशियाकडून काही शस्त्रं हवी आहेत ती मिळवण्यासाठी दृष्टीनंही राजनाथ यांचा हा रशिया दौरा महत्वाचा आहे.

भारताला रशियाकडून सुखोई Su-30 फायटर जेट, T-90 रणगाडे, रशियन युद्धनौका  आणि  S-४०० ही अँटी मिसाईल सिस्टीम हवे आहेत. रशियात दुसऱ्या महायुद्धाच्या पंचाहत्तरीचा सोहळा आहे. या सोहळयाला चीनच्या संरक्षणमंत्र्यांनाही आमंत्रण आहे. पण भारतासाठी या दौऱ्यात एकच ध्येय असेल ते म्हणजे Su-30 फायटर जेट, T-90 रणगाडे, युद्धनौका आणि S-४०० रशियाकडून लवकरात लवकर मिळवणं. २०१८ मध्ये रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे भारतात आले होते. त्याचवेळी S-४०० या अँटी मिसाईल सिस्टीमच्या खरेदीबाबत करार झाला होता.

हवाई संरक्षणाच्या दृष्टीनं सर्वात आधुनिक सिस्टीम मानली जाते. हा करार होऊ नये यासाठी अमेरिकेचा मोठा दबाव त्यावेळी भारतावर होता. खरंतर चीन आणि रशियाचे लष्कही संबंधही घनिष्ठ राहिले आहेत. चीनला अनेक महत्त्वाची शस्त्रास्त्रं रशियाकडूनही मिळालेली आहेत. आता ज्या S-४०० ची भारत वाट पाहतोय, ते चीनला रशियाकडून याच्या आधीच मिळालेलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”