‘आयएनएस विराट’ चा लिलाव आज; संरक्षण मंत्रालयाचा निर्णय  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झाल्यानंतर मुंबईच्या गोदीत उभी असलेल्या बहुचर्चित ‘आयएनएस विराट’ या विमानवाहू नौकेचा लिलाव मंगळवार, १७ डिसेंबरला होत आहे. त्यानंतर ऑनलाइन बोलीद्वारे ही नौका भंगारात काढण्यासाठी रवाना केली जाईल. यामुळे मुंबईतील गोदीत चार ते सहा युद्धनौकांचा तळ नौदलाला मिळणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार, ‘विराट’ला भंगारात काढण्यासंबंधी केंद्र सरकारच्या मेटल स्क्रॅब ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून १७ डिसेंबरला दुपारी १२ ते ४ दरम्यान लिलाव होईल. तसेच या लिलावानंतर नौका प्रत्यक्ष तोडताना त्यातील किमान दहा टक्के लोखंडाचा वापर व्यावसायिक वापरासाठी केला जावा. हे लोखंड भारतीय कंपन्यांना पुरवले जावे, अशी अटही ठेवण्यात आली आहे.

‘आयएनएस विराट’ ही मूळ ब्रिटिश बनावटीची नौका असून ती १९८७ साली नौदलात दाखल झाली. २२६.५० मीटर लांबीची ही नौका आहे. ऑनलाइन लिलावात सर्वाधिक बोली लावून कंत्राट जिंकणारी कंपनी या नौकेला गुजरातलाच नेण्याची शक्यता आहे.

Leave a Comment