केंद्रीय आरोग्य पथकाकडून क्रांतीचौक वॉर्डाची पाहणी

चाचण्या व लसीकरणाबाबत अधिका-यांना सूचना

औरंगाबाद | जिल्हयातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या क्रांतीचौक वॉर्डमधील झांबड इस्टेट आणि श्रेयनगर परिसर वाढत्या रुग्णसंख्येमुळे मिनी कंटेनमेंट झोन जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज क्रांती चौक वॉर्डमधील झांबड इस्टेट येथे केंद्रीय आरोग्य पथकाने पाहणी केली. तसेच परिसरातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या आणि लसीकरण करून घेण्याबाबत संबंधित अधिका-यांना सूचना केल्या.

याप्रसंगी केंद्रीय आरोग्य पथकाचे प्रमुख तथा सहप्राध्यापक, जनऔषध विभाग, मध्य प्रदेशचे डॉ. अभिजित पाखरे, डॉ. कराड, आरोग्य अधिकारी डॉ. अमरज्योती शिंदे, वॉर्ड अधिकारी संपत जरारे, नगरसेविका शिल्पाराणी सागर वाडकर, सागर वाडकर, सतीश ताजी, गणेश खरात यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पाखरे यांनी नगरसेविका वाडकर यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास आणि वॉर्डातील नागरिकांना कोरोना काळात करत असलेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले.

You might also like