सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
नवदुर्गा ही नोकरी करणारी किंवा लग्न झालेली गृहीणीच असते असे नाही. काही युवतीही आपल्या वागणूकीतून, जबाबदारीतून व यशातून नवदुर्गाच ठरतात. माण तालुक्यातील सानिका सदाशिव यादव ही महाविद्यालयीन युवतीही नवदुर्गा अगदी थोड्या काळात पडलेल्या जबाबदारीतून ठरते. या नवदुर्गेने आपल्यावर असलेल्या अपेक्षांची पूर्ती करत नीट, सीईटी परिक्षेत 720 पैकी 663 गुण मिळवत यश मिळवले. सानिकाच्या या आनंददायी यशात सैन्यदलात असलेल्या वडिलांचे भूसुरूंगाच्या स्फोटात डोळे गमावल्याची बातमी समजली अन् अख्खे कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
सानिका हिचे वडिल सदाशिव यादव हे सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात भूसुरुंगाच्या स्फोटाने वडीलांचे दोन्ही डोळे निकामी झाले. वडीलांचे डाॅक्टरकीचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सानिका नीट परिक्षेचा अभ्यास मोठ्या जिद्दीने करत होती. मुलगी नीट परिक्षेचा अभ्यास करत असलेल्या मुलींला अभ्यासात व्यत्यय येईल, ती खचून जाईल म्हणून तिच्यापासुन ही दुर्दैवी प्रसंगाची माहिती कुटुंबाकडुन लपविण्यात आली. वडीलांवर आलेल्या या दुर्दैवी घटनेची कसलीच कल्पना नसणार्या या मुलींने नीट व सीईट परिक्षेत उज्वल घवघवीत यश संंपादन केले. परंतु आपल्या वडीलांवरती आलेल्या दुर्दैवी संकटाची माहिती मिळताच ती आपल्या यशाचा आनंद क्षणार्धात हरवुन बसली. सैरभैर झाली, अन् तीने आपल्या वडीलांना मिठी मारुन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. बापलेकीच्या या भावुक भेटीनंतर यादव कुटुंबिय ही आपले अश्रूं थांबवू शकले नाही.
सानिकाची शैक्षणिक प्रवास
सानिका हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षक दहिवडी येथील परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयात, तर 11 वी व 12 वीचे शिक्षक कराड येथील लिगाडे- पाटील ज्युनिअर काॅलेजमध्ये झाले. सानिकाचा प्राथमिक शिक्षणाचा पाया शिक्षिका पुर्ववसू खुडे या शिक्षकेने मजबूत केल्याचे सानिका व तिच्या कुटुंबियाकडून मोठ्या अभिमाने सांगितले जाते. सानिकाला तिची मोठी बहिण शिवानी यादव ही कराड येथे बीएसस्सी करत असून तिनेच खूप मदत केली. सानिका सदाशिव यादव (मूळ रा. दानवलेवाडी, पो. वावरहिरे, ता. माण, जि. सातारा) येथील आहे. तिने कोणत्याही प्रकारचे खासगी क्लासेस न लावता हे यश मिळविले. सानिकाने दहावीत 98 टक्के तर बारावीत 91.33 टक्के गुण मिळविले होते. आता नीट, सीईटी तिने 720 पैकी 663 गुण मिळवून कुटुंबाला एक मोठे यश मिळवून दिले आहे.