Satara News : कराडच्या कृष्णा नदीवरील पुलावर पसरणार स्ट्रीटलाईटचा झगमगाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलानी
कऱ्हाड-विटा मार्गावर येथील कृष्णा नदीवर कोट्यवधीचा पूल उभारला गेला; पण या पुलावर एकही पथदिवा लावला गेला नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात या पुलावर काळोख पसरत असतो. त्यामुळे याठिकाणी स्ट्रीटलाईटआणि CCTV बसवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने वृत्त प्रसिद्ध करताच याची संबंधित विभागाकडून वृत्ताची दखल घेत आता या पुलावर स्ट्रीट लाईट बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी CCTV कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत.

कराड- विद्यानगर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्वर्गीय पी.डी.पाटील यांच्या प्रयत्नामुळे शिक्षणामध्ये कराडची ओळख जगभर पसरली आहे. शिक्षणामुळे सर्व कॉलेज, शाळा, क्लासेस याच भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या भागात आणि प्रामुख्याने या रस्त्यावर रहदारी मोठया प्रमाणावर असते. या रस्त्यावर सध्या रात्रीच्या वेळी अंधार पडत आहे.

कृष्णापूल ते बनवडी फाटा मार्गावर स्ट्रीटलाईट, CCTV बसवावेत : नवाज सुतार

या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातही वारंवार होत असतात. तेव्हा कृष्णा पूल ते बनवडी फाटा रस्त्यावर स्ट्रीट लाईट आणि CCTV बसवण्यात यावेत, अशी मागणी 19 जून 2022 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत हॅलो महाराष्ट्रानेही वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाकडून आता पुलावर स्ट्रीट लाईट बसवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत.