कृष्णापूल ते बनवडी फाटा मार्गावर स्ट्रीटलाईट, CCTV बसवावेत : नवाज सुतार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णापूल ते बनवडी फाटा मार्गावर स्ट्रीटलाईट आणि CCTV बसवावेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले आहे.

पत्रात म्हटले आहे की, कराड- विद्यानगर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि स्वर्गीय पी.डी.पाटील साहेब यांच्या प्रयत्नामुळे शिक्षणामध्ये कराडची ओळख जगभर पसरली आहे. शिक्षणामुळे सर्व कॉलेज, शाळा, क्लासेस याच भागात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या भागात आणि प्रामुख्याने या रस्त्यावर रहदारी मोठया प्रमाणावर असते. या रस्त्यावर सध्या रात्रीच्या वेळी अंधार पडत आहे.

या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातही वारंवार होत असतात. तेव्हा कृष्णा पूल ते बनवडी फाटा रस्त्यावर स्ट्रीट लाईट आणि CCTV बसवण्यात यावेत. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य नवाज सुतार (बाबा), समीर कुडची, सुरज जाधव, इरफान बागवान, महानंद काटेरे उपस्थित होते.

Leave a Comment