INSTC: भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार झपाट्याने वाढत आहे. 2021 च्या तुलनेत 2023 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 4 पटीने वाढला आहे. सध्या भारतातून रशियाला माल पाठवायला 45 दिवस लागतात. मात्र आता हा प्रवास 10 दिवसांत पूर्ण होणार आहे. युक्रेनसोबतच्या (INSTC) युद्धादरम्यान रशियाने आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरबाबत सहमती दाखवली आहे.
या प्रकल्पात भारत आणि रशियाशिवाय इराण आणि अझरबैजानचाही सहभाग आहे. या प्रकल्पांतर्गत रशिया, इराण आणि भारत हे देश समुद्र, रेल्वे आणि रस्त्यांद्वारे जोडले जातील. त्याचा उद्देश व्यवसायातील खर्च आणि वेळ वाचवणे हा आहे.
भारत रशिया दरम्यान व्यापारी मार्ग (INSTC)
जुना मार्ग सध्या भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारासाठी वापरला जात आहे, जो सुएझ कालव्यातून जातो. पण INSTC ची निर्मिती झाल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे. या मार्गाने मुंबई इराणच्या पोर्ट अब्बास, तेहरान, रास्त, अस्तारा मार्गे अझरबैजानला पोहोचेल.
हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर वेळेची बचत होणार असून मालवाहतुकीचा खर्चही (INSTC) कमी होणार आहे. सध्या मुंबई ते मॉस्कोला माल नेण्यासाठी 14 हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. हा मार्ग सुएझ कालव्यातून जातो. यास 45 दिवस लागतात. पण INSTC वरून माल पाठवायला फक्त 10 दिवस लागतील.