सातारा पालिकेच्या अधिकाऱ्याला शिविगाळ; कर्मचारी आक्रमक; कामबंद आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सातारा पालिकेत सध्या कार्यरत असलेले कोरोना कक्ष अधिकारी प्रणव पवार यांना एका पक्षातील कार्यकर्त्याने दमदाटी व शिवीगाळ केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर सातारा पालिकेतील अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे. तसेच संबन्धित कार्यकर्त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करीत बुधवारी सातारा पालिकेसमोर एक दिवसीय आंदोलन केले.

कोरोना कक्ष अधिकारी प्रणव पवार यांना एका पक्षातील कार्यकर्त्याने दमदाटी केल्याप्रकरणी सातारा पालिकेतील सातारा अपलिक कामगार युनियनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी बुधवारी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घोषणा देत आंदोलन केले. दमदाटी करणाऱ्या संबंधित कार्यकर्त्यावर कडक कारवाई प्रशासनाने करावी, अशी मागणीही यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.

सातारा पालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी व अपमानास्पद वागणूक काही नागरिकांकडून दिली जात आहे. दि १४ रोजीही मुख्याधिकारी यांना एका नगरसेविकेने अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना घडली. त्यावेळी पालिकेतील कर्मचाऱ्यांनी पालिकेचे कामकाज बंद ठेवत या घटनेचा निषेध नोंदवला. याच दिवशी कोरोना कक्ष अधिकारी प्रणव पवार हे कक्षात काम करीत असताना एका पक्षातील कार्यकर्त्याने कक्षात प्रवेश करीत पवार यांना दमदाटी करीत शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. या घडलेल्या प्रकारचा बुधवारी सर्व पालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.

Leave a Comment