हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Interest Rates on Savings Account : सध्याच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे बँकेचे बचत खाते आहे. या बचत खात्यात कितीही रक्कम ठेवता येते. त्याच प्रमाणे बँकांकडून त्यावर व्याज देखील दिले जाते. या बचत खात्यामध्ये जमा केलेले पैसे कधीही काढता येतात. मात्र याचे व्याजदर प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असतील. तर आज आपण अशा काही बँकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या बचत खात्यावर 7.5% पर्यंतचा व्याज दर देत आहेत.
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, आघाडीच्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत स्मॉल फायनान्स बँका आणि नवीन खाजगी बँकाकडून आपल्या बचत खात्यांवर जास्त व्याज दर दिला जात आहे. हे जाणून घ्या कि, यामध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स कडून आपल्या बचत खात्यावर सर्वाधिक 7.5% पर्यंत व्याज मिळतो आहे. Interest Rates on Savings Account
एयू स्मॉल फायनान्स बँक, डीसीबी बँक आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकांकडून आपल्या बचत खात्यांवर 7 टक्क्यांपर्यंतचा व्याजदर दिला जातो आहे. मात्र इथे हे लक्षात असू द्यात कि, यासाठी एयू स्मॉल फायनान्स बँकेमध्ये सरासरी मंथली बॅलन्स 2,000 रुपये ते 5,000 रुपये आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेत 2,500 रुपये ते 10,000 रुपये तसेच DCB बँकेमध्ये सरासरी मंथली बॅलन्स 2,500 रुपये ते 5,000 रुपये असणे आवश्यक आहे. Interest Rates on Savings Account
त्याच बरोबर बंधन बँक, CSB बँक आणि RBL बँकेकडून आपल्या बचत खात्यांवर 6.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिला जातो आहे. या तिन्ही बँकांमधील सरासरी मंथली बॅलन्स 2,500 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान असावा लागेल. Interest Rates on Savings Account
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.bankbazaar.com/savings-account/savings-account-interest-rates.html
हे पण वाचा :
Home Loan : आता ग्राहकांना पुन्हा बसणार महागड्या कर्जाचा फटका, अनेक बँकांनी व्याजदरात केली वाढ
LIC Jeevan Labh Policy : एलआयसीच्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा 54 लाखांचा रिटर्न
7th Pay Commission : नव्या वर्षात सरकार कर्मचार्यांना देणार ‘या’ 3 मोठ्या गुड न्युज
Rooftop Solar Yojana : सरकारने वाढवली ‘या’ योजनेची मुदत; तुम्हीसुद्धा घरावर बसवून घ्या सोलर पॅनल
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 256 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा