धक्कादायक!! आंतरधर्मीय जोडप्याला मुस्लिम तरुणांकडून जबर मारहाण; Video Viral

Crime News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या कर्नाटकमध्ये आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. याठिकाणी काही मुस्लिम तरुणांनी एका आंतरधर्मीय जोडप्याला जबर मारहाण केली आहे. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. सध्या हावेरी जिल्ह्यात जोडप्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी आंतरधर्मीय जोडप्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. काही मुस्लिम आरोपी तरुणांना आंतरधर्मीय जोडपे हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर आरोपी हॉटेलमध्ये शिरले आणि त्यांनी जोडप्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, त्यांनी तरुणीला जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार कॅमेरात रेकॉर्ड झाला.

या सर्व घटनेनंतर हावेली पोलिसांनी आरोपींना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन जणांना अटक केली असल्याची माहिती दिली आहे. काही आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र आंतरधर्मीय जोडप्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कर्नाटक हादरले आहे.