दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस
दलांलाची टोळीच दहिवडी शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असल्याचे दिसून येते. आधिकाऱ्यांकडे गेल्यास कामच होत नाही, तर दलांलाचा माध्यामातून काही तासातच काम होवून जाते. यामुळे अनेजण दलालांचा आधार घेत आहे. तर दुसरीकडे काही आधिकारी व कर्मचाऱ्यांनी एजंट नेमल्याची दबक्या आवाजातच चर्चा आहे.
घरकूल योजना, शिधापत्रिका, विधवा पेशन योजना, अंपग वेतन, कृषी विभाग, तहसील कार्यालय आदीमध्ये विविध कामासाठी ग्रामीण भागातील नागरिक येतात. मात्र या ठिकाणी येणाऱ्यांना योजनेचा लाभ कसा घ्यावी, त्यांची माहितीच नसते. या योजनेची माहिती आधिकारी वर्गाला विचारावे तर ते उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
कोरोना महामारीच्या ताळेबंदी उठल्यावर प्रशासकीय कामे करण्यासाठी तालुक्यातील सामान्य जनता हेलपाटे घालत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन मध्यस्थी गोरं गरिबांना लुटण्याचं काम करत आहे. उत्पनाचा दाखला, शिधापत्रिका, नविन काढणे, विभक्त करणे किंवा शिधापत्रिका काम असो, सामान्याच्या कामात दिरंगाई करणे, तसेच 7/12, 8अ चे जुने रेकॉर्ड, समन्स बजावणे, अदखलपात्र गुन्हे, विशेष करून 32 ची नवीन शर्त, जमिन खरेदी विक्री नोंदी असोत.
सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत तहसीलदार कार्यालयाच्या आवारात, ऑफिसमध्ये, परिसरात कर्मचारी हजर होण्याअगोदरच मध्यस्थी अडलेल्या नागरिकांना व अडलेल्यांची तातडीची कामे हेरून ती कामे मार्गी लावण्यासाठी साहेबांच्या जवळचे असल्याचे सांगून हे मध्यस्थी अतिरिक्त व जास्तीचे पैसे घेऊन कामे करत आहेत. विशेषता मध्यस्थीकडून गेलेली कामे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून तातडीने केली जात आहेत. यामुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास कमी होऊन मध्यस्थीवरील विश्वास वाढू लागला आहे, हा सर्व प्रकार गेल्या तीन वर्षांपासून चालू आहे.
कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिकांची कामे अडकून आहेत. ताळेबंदी उठल्यावर सामान्य नागरिक आपली प्रशासकीय व महसूल विभागातील कामे करण्यासाठी बाहेर पडत आहे. कार्यालयाबाहेर मध्यस्थी कमिशन घेऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून कामे मार्गी लावत आहेत.
वशिलेबाजी कधी थांबणार ?
एका कामासाठी अख्खा दिवस जावूनही त्या दिवशी काम होत नाही. मजूरी बूडवून शासकीय कार्यालयात आलेल्यांना निराश होउन परत जावे लागते. दलांलाचे आधिकारी वर्गासोबत साटेलोटे असल्याची चर्चा सुरू आहे.