अबू धाबी वृत्तसंस्था | १, २ मार्च दरम्यान दोन दिवसीय चालणाऱ्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओआयसी) ची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी सन्माननीय पाहुणे म्हणून बैठकीत भारताला पहिल्यांदाच आमंत्रित केले गेले आहे.त्यासाठी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या बैठकीस गेल्या आहेत.
सुषमा स्वराज या शुक्रवारी ओआयसी बैठकीच्या उद्घाटन समारंभास उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि म्हटले की हे संकट “धर्माचे विकृती” आणि “भ्रमित विश्वास” या मुळेच येत आहे. तसेच त्या म्हणाल्या की, दहशतवादाविरुद्ध लढणे कोणत्याही धर्माविरुद्ध टकराव नाही.इस्लामचा खरोखरच शांतीचा अर्थ असा आहे की, कोणालाही हिंसा नाही. तसेच, जगातील प्रत्येक धर्मामध्ये शांती, करुणा आणि बंधुत्वाचा हक्क आहे, असे स्वराज यांनी ५७ सदस्यीय शक्तिशाली गटबद्धतेला सांगितले.
पाकिस्तानचे पराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी स्वराज या बैठकीला उपस्थित राहणार असतील तर पाकिस्तान या बैठकीवर बहिष्कार टाकेल अशी धमकी दिली होती. स्वराज यांचे निमंत्रण रद्द करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न फोल ठरले आहेत. लवामावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीव्र तणाव निर्माण झाला आहे.
इतर महत्वाचे –
किसान सन्मान निधी योजनेत ‘हा’ बदल
सांगली च्या विकासकामांसाठी मुख्यमत्र्यांकडुन १०० कोटींची मान्यता
गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा