हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वेगवान धावण्याने सातारा जिल्ह्याचं नाव देश-विदेशात पोहचवणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव यांच्या स्मृती प्रवेशद्वाराचं उद्धाटन आज पार पडलं. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज पेट्रोल पंपाजवळील हा कार्यक्रम संपन्न झाला. खासदार उदयनराजे यांनी यावेळी धावपटू नंदा जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “ज्यावेळी सातारा शहराची वाढ झालेली नव्हती तेव्हा इथल्या डोंगरातून, माळरानातून धावणारी बारीक अंगकाठीची नंदा आम्ही बघायचो. अत्यंत खडतर परिस्थितीतून स्वतःच्या धावण्याची आवड नंदाने जोपासली. तिने प्रचंड मेहनत घेऊन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. साताऱ्याचं नाव मोठं केलं. आज नंदाताई आपल्यात नाही या गोष्टीला २४ वर्षं झालीत. मात्र तरीही तिच्या कामगिरीमुळे ती आजही आठवणींच्या रुपात आपल्यात जिवंत आहे.
आपल्या संसदीय कामात नंदाताईंचा उल्लेख झाल्याची आठवणही उदयनराजे यांनी सांगितली. ते म्हणाले, “पी टी उषा या आता राज्यसभा खासदार आहेत. आमची मागे चर्चा झाली तेव्हा त्या मला सांगत होत्या, “नंदा खूप धाडसी मुलगी होती. ग्रामीण भागातून आलेली अशी मुलगी देशपातळीवर नाव करते ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मार्गदर्शनाच्या निमित्ताने आम्ही एकमेकींशी गप्पा मारायचो. मला त्यावेळी नंदाकडून खूप शिकायला मिळालं.”
या आठवणींचा दाखला देत असतानाच प्रवेशद्वाराचं काम पूर्ण होईल तेव्हा उद्घाटन कार्यक्रमाला आपण पी टी उषा यांना आवर्जून बोलवू असंही उदयनराजे म्हणाले.
१४ वर्षांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन १०० हून अधिक विजेतेपद मिळवलेल्या नंदा जाधव यांच्या कामाची प्रेरणा आताच्या तरुणाईला मिळावी यासाठी क्रीडा प्रबिधिनी (अकादमी) सुरू करण्याचा प्रस्ताव यावेळी क्रीडा संघटक सुरेश साधले आणि डॉ प्रवीण जाधव यांनी उदयनराजे यांच्याकडे दिला. या प्रस्तावावर नक्की विचार करू, केंद्र सरकारकडूनही निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिलं.
यावेळी माजी कार्यकारी अधिकारी टी आर गारळे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव कणसे, जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई, संभाजीनगरचे सरपंच सतीश माने, जयवंत मोरे, सुभाष मगर, आणि परिसरातील शेकडो नागरिक, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
डॉ. प्रवीण जाधव
आंतरराष्ट्रीय धावपटू नंदा जाधव स्मृती प्रतिष्ठान, सातारा
9822404365
हे पण वाचा :
Bank FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! सरकारी बँका देत आहेत मजबूत रिटर्न
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे नवीन भाव
adhaar Card Pan Card Link : आयकर विभागाने जारी केली महत्वाची सूचना, 31 मार्चपर्यंत लिंक करा अन्यथा…