Amazonचे मालक जेफ बेझॉस यांचा फोन हॅक? सौदीचे राजपुत्र महंमद बिन सलमानवर संशय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी Amazon चे मालक जेफ बेझॉस याचा फोन हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. The Guardian या वृत्रपत्राने याबाबत वृत्त दिलेले आहे. महत्वाची बाब म्हणजे सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांच्यावर बेझॉस यांचा फोन हॅक केल्याचा आरोप या वृत्तात केला गेला आहे. सौदीचे राजपुत्र सलमान यांच्या नंबरवरून एक WhatsApp मेसेज रिसिव्ह केल्यानंतर जेफ बेझॉस यांचा मोबाइल हॅक झाल्याचं सांगितलं जात आहे.

The Guardianच्या वृत्तानुसार, दोन वर्षांपूर्वी म्हणजे १ मे २०१८ रोजी बेझॉस आणि सलमान यांच्यातील चर्चेदरम्यान एक व्हिडिओ सेंड करण्यात आला होता. हा व्हिडिओ म्हणजे बेझॉस यांच्या फोनमध्ये घुसखोरी करण्यासाठी खास डिझाइन करण्यात आलेला व्हायरस (malicious file) असलेली फाइल होती. काही तासांमध्येच जेफ यांच्या मोबाइलमधून बराच डेटा चोरीला गेला. पण, नेमका कोणता डेटा चोरीला गेला याबाबत माहिती नसल्याचं The Guardian ने आपल्या वृत्तात स्पष्ट केलं आहे.

 

या बेझॉस यांच्या फोन हॅकिंग वृत्तानंतर ‘वॉशिंगटन पोस्ट’चे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येबाबतही अनेक सवाल उपस्थित होत आहेत. फोन हॅकिंगच्या पाच महिन्यांनंतर ऑक्टोबर 2018 मध्ये पत्रकार जमाल खशोगी यांची हत्या झाली होती. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ अमेरिकेचे प्रसिद्ध वृत्तपत्र असून जेफ बेझॉस हेच याचे मालक आहेत. दुसरीकडे, सौदीचे परराष्ट्र मंत्री अदिल अल-जुबेर यांनी सर्व आरोप फेटाळताना या प्रकरणाशी सौदी अरेबियाचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेतील सौदीच्या दूतावासाने सलमान यांच्यावरील फोन हॅकिंग चा आरोप फेटाळला असून याबाबत चौकशी करणार आल्याचे म्हटलं आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा- amazon-bosss-jeff-bezos-phone-hacked-by-saudi-crown-prince-

काही गोष्टी सांगता येत नाहीत, ‘अ‍ॅटलास’ सायकल कंपनीच्या मालकाच्या पत्नीची आत्महत्या

प्रिय ट्रोलर्स, तुम्ही कितीही खोटं बोललात तरी ‘छपाक’ यशस्वी झालाय..!! पहा सविस्तर आकडेवारी

५२ व्या वर्षी अभिनेत्रीनं केलं पाचवं लग्न; कोण आहे ही अभिनेत्री