शेतकरी आंदोलनाचा धसका! हरयाणा सरकारने केली इंटरनेट सेवा बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शेतकरी आंदोलन पुन्हा मजबूत होताना दिसताच हरयाणातील भाजप सरकारने काही जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे. शेतकरी नेते राकेश टीकेत यांचा अश्रू अनावर झालेला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हरयाणातील अनेक गावखेड्यांत भावूक लहर उठून शेतकरी दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकरी जमू लागले आहेत. या गोष्टीचा धसका घेत शेवटी हरयाणा सरकारने तडकाफडकी केली इंटरनेट सेवा बंद केली आहे.

हरयाणा सरकारने राज्यातील १४ जिल्ह्यात उद्या ३० जानेवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अंबाला, यमुना नगर, कुरुक्षेत्र, कर्नाल, कैथल, पानिपत, हिसार, जिंद, रोहतक, भिवानी, चरखी दादरी, फतेहबाद, रेवरी आणि सिरसा या जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलनाची धार काहीशी कमी होताना दिसत होती. ही संधी पाहून सरकारने दिल्ली सीमेवरील सीमा मोकळ्या करण्याचे आदेश दिले. शेतकरी नेते राकेश टिकेत यांना माध्यमांशी संवाद साधताना अश्रू अनावर झाले. तिन्ही कायदे मागे न घेतल्यास आत्महत्या करेन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यानंतर टिकेत यांनी उपोषण सुरू केलं. यानंतर पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरयाणात एक भावुक लहर उठली. आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरयाणातील अनेक गावखेड्यांतील शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्ली सीमेची वाट धरली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment