Intestine Swelling | आतड्यांमध्ये सूज आल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे; दुर्लक्ष न करता त्वरित घ्या उपचार

Intestine Swelling
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Intestine Swelling | आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. आपण छोट्या-मोठ्या दुखापतींकडे दुर्लक्ष करतो. परंतु नंतर जाऊन त्याच एका मोठ्या गंभीर आजाराचे रूप धारण करतात. आतडे हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपले अन्न पचण्यासाठी आपल्या आतडे महत्त्वाचे असते. अन्नाचे पचन करणे यासारखी महत्त्वाची कामे आतडे करतात.

जर तुमच्या आतड्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, तर थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. जसे की, बॅक्टेरियाचा संसर्ग असंतुलित आहार, अल्सरेटिव्ह यांसारख्या अनेक आजारांमुळे आतड्यांमध्ये समस्या उद्भवतात. आणि यामुळे माणसाचे पचन देखील नीट होत नाही. आणि शरीराला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या आतड्या संबंधित काही समस्या असतील, तर त्या वेळेवर ओळखणे आणि त्यावर योग्य उपचार घेणे खूप गरजेचे आहे. आता आतड्यांमध्ये (Intestine Swelling) काही बिघाड झाल्यास तुम्हाला कोणती लक्षणे दिसतात? हे आज आपण जाणून घेणार आहे.

पोटदुखी आणि गोळे येणे | Intestine Swelling

ज्यावेळी तुमच्या आतड्यांना सूज येते. त्यावेळी पोटात खूप जास्त वेदना होतात. आणि गोळे येतात. ही वेदना ओटी पोटात वेदना होतात. जेव्हा आपण कोणताही पदार्थ खातो. तेव्हा पोटातील दुखणे जास्त वाढते. जर तुम्हाला देखील अशी समस्या उद्भवत असेल, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

अतिसार

आजकाल बाहेरील पदार्थ जास्त प्रमाणात खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आणि यामुळेच तुम्हाला जुलाबाची समस्या होते. अनेक वेळा लोक ही सामान्य समस्या आहे, असे समजून याकडे दुर्लक्ष करतात. परंतु जर तुम्हाला खूप दिवसापासून असा त्रास होत असेल आणि आतड्यांमध्ये जळजळ होत असेल. त्यावेळी तुमच्या आठवड्यात सूज येत असते. आणि याचा परिणाम तुमच्या पचन प्रक्रियेवर झालेला असतो. त्यामुळेच डायरीयाची समस्या देखील होऊ शकते.

शौचामधून रक्तस्त्राव

जर तुमच्या आतड्यात कोणत्याही प्रकारचा बिघड झाला असेल किंवा जळजळ झाली असेल, तर तुमच्या शौचासह रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. यावेळी गुदशय भागात देखील खूप वेदना होतात. आणि आतड्याच्या हालचाली देखील वेदनादायक असतात. हे अत्यंत गंभीर लक्षण आहे. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

थकवा आणि अशक्तपणा | Intestine Swelling

ज्यावेळी आपल्या आतड्यांना सूज येते. किंवा जळजळ होते. त्यावेळी आपल्याला सतत थकवा जाणवतो आणि अशक्तपणा येतो. आतड्यांमध्ये जळजळ झाल्याने पोषक तत्त्वावर त्याचा परिणाम होतो. आणि तुम्हाला थकवा येतो. अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांचे संपर्क साधा.