हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या घडीला म्युच्युअल (Mutual Fund) फंडातील गुंतवणूकदारांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. कारण म्युच्युअल फंडातून सर्वाधिक परतावा देण्यात येतो. म्युच्युअल फंडामुळेच गुंतवणूकदारांना श्रीमंत होण्याची संधी मिळाली आहे. अशा अनेक कारणांमुळे तुम्ही देखील जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय आणला आहे. ज्यात तुम्ही गुंतवणूक करून उत्तम नफा मिळवू शकता.
म्युच्युअल फंडात उत्तम पर्याय म्हणून क्वांट इन्फ्रास्ट्रक्चरकडे पाहिले जात आहे. या फंडाने गेल्या एका वर्षात चांगला परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे. सांगितले जात आहे की, गेल्या बारा महिन्यांमध्येच या म्युच्युअल फंडाकडून सुमारे 75.44 टक्के परतावा मिळाला आहे. म्हणजेच, या म्युच्युअल फंडाने एका वर्षात 1 लाखाचे 1.75 लाख रुपये करून दिले आहेत. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.
याबरोबरच निप्पॉन इंडिया पॉवर आणि इन्फ्रा म्युच्युअल फंडाने देखील गेल्या एका वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 12 महिन्यामध्ये 76.36 टक्के परतावा देणारे फंड निप्पॉन इंडिया पॉवर आणि इन्फ्रा ठरले आहे. म्हणजेच ग्राहकांना या म्युच्युअल फंडाकडून एका वर्षात 1 लाखांचे 1.76 लाख रुपये करून मिळाले आहेत. त्यामुळेच आता गुंतवणूकदार ही सर्वात जास्त या फंडांमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत.
दरम्यान, इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, HDFC फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंडांपैकी एक आहे. गेल्या 29 वर्षांमध्ये या फंडाने स्थिर गुंतवणूकदारांच्या पैशात 150 पट वाढ केली आहे. या कालावधीत कंपनीने 18.87% CGRA दिला आहे. त्यामुळे इतर फंडासह या फंडामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे