व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

प्रॉपर्टी विकून मिळालेल्या नफ्यावरील टॅक्स वाचवण्यासाठी ‘या’ बॉण्ड्स मध्ये करा गुंतवणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर एखादी प्रॉपर्टी विकून पैसे मिळवले असतील आणि त्याद्वारे मिळालेल्या नफ्यावर तुम्हांला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्‍स टॅक्स द्यावा लागला तर टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला पब्लिक सेक्‍टर अंडरटेकिंग (PSU) द्वारे जारी करण्यात आलेल्या कोणत्याही बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करावी. यामुळे तुमचा टॅक्सही वाचेल आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हांला चांगले रिटर्न देखील मिळेल.

या बॉण्ड्समध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण या बॉण्ड्सना सरकारचा पाठिंबा असतो. हे बॉण्ड्स पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही त्यामुळे करदात्याला टॅक्स वाचवण्यासाठी इतरत्र कुठेही गुंतवणूक करण्याची गरज नसते.

जर आपण एखादी प्रॉपर्टी 2 वर्षांपर्यंत ठेवून नंतर ती विकली तर त्याद्वारे मिळालेल्या नफ्यावर आपल्याला 20 % लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्‍स टॅक्स (LTCGT) द्यावा लागतो. हा टॅक्स देण्यापासून वाचण्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी विकल्याचे सहा महिन्यांपर्यंत बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करावी लागेल. आयकर कायद्याच्या कलम 54EC अंतर्गत, अशा गुंतवणुकीवर टर्म कॅपिटल गेन्‍स टॅक्स (LTCGT) मधून सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

प्रॉपर्टी विकून त्याद्वारे मिळालेल्या नफ्यावर Rural Electrification Corporation – REC सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे जारी केलेल्या बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करावी लागेल. 1 एप्रिल 2022 पासून, REC ने नवीन बॉण्ड्स जारी करण्यास सुरुवात केली आहे.