हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या काळात पैशाची बचत आणि गुंतवणूक (Investment Plan) हि गरज बनली आहे. पैशाच्या गुंतवणुकीसाठी आजकाल अनेक बँका नवनवीन योजना राबवत असतात. ज्यातून तुम्ही कमीत कमी पैसे गुंतवून जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच एक स्कीम सांगणार आहोत. देशातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी लखपती योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही दरमहा फक्त ५९३ रुपये जमा करून लखपती होऊ शकता. हि योजना नेमकी आहे तरी कशी? कशा प्रकारे ग्राहकांना रिटर्न दिला जातो याचीच माहिती सविस्तर जाणून घेऊयात.
SBI ची “लखपती आरडी योजना” असं या योजनेचं नाव असून ती “हर घर लखपती योजना” म्हणूनही ओळखली जाते. ही एक आवर्ती ठेव (RD) योजना आहे. सर्वसामान्य ग्राहकांना त्यांच्या छोट्या बचतीतून १ लाख रुपयांपर्यंतची मॅच्युरिटी रक्कम गाठून देणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. लखपती आरडी योजनेत सर्वसामान्य ग्राहकांना ६.७५% दराने व्याज मिळते, तर ज्येष्ठ नागरिकांना ७.२५% वार्षिक व्याज मिळते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपये वाचवू शकता. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही अवघ्या ५९३ रुपयांपासून करू शकता. जर तुम्ही त्यात दरमहा 593 रुपये देखील जमा केले तर 10 वर्षांत तुमच्याकडे १ लाख रुपये जमा होतील. आणखी एक पर्याय म्हणजे जर तुम्हाला १ लाख रुपयांचा निधी लवकरात लवकर म्हणजेच ३ वर्षांत गोळा करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला २५०२ रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला फक्त २४८२ रुपये जमा करावे लागतील.
SBI हर घर लखपती आरडी कोण उघडू शकतो?
सर्व भारतीय नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. दहा वर्षांखालील अल्पवयीन मुलांना त्यांचे खाते उघडण्यासाठी (Investment Plan) पालक किंवा पालकाची आवश्यकता असते, तर दहा वर्षांवरील मुले स्वतः नोंदणी करू शकतात. तुम्ही त्यात एकटे किंवा संयुक्त खात्याद्वारे गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एसबीआय शाखेत जाऊ शकता. येथे तुम्हाला योजनेशी संबंधित फॉर्म मिळवावा लागेल आणि तो भरावा लागेल. यानंतर तुम्हाला काही संबंधित कागदपत्रे देखील सादर करावी लागतील.
अचानक पैसे काढण्यासाठी दंड– Investment Plan
या योजनेअंतर्गत लवकर पैसे काढल्यास दंड आहे. जर ठेवलेले पैसे लवकर काढले गेले तर, मुद्दल ५ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास ०.५० टक्के दंड आकारला जाईल. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी, दंड १ टक्क्यापर्यंत वाढवला जाईल. याव्यतिरिक्त, ठेव उघडल्यापासून ७ दिवसांच्या आत काढल्यास कोणतेही व्याज दिले जात नाही, ज्यामुळे योजना दीर्घकालीन वचनबद्धता राहील याची खात्री होते.




