हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Strategy) शेअर बाजारात कायम चढ उतार होत असतो. त्यामुळे कधी भरपूर फायदा तर कधी तोटा सहन करावा लागतो. एकंदरच काय तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगल्या किंवा वाईट बातम्यांवर लक्ष ठेवावे लागते. बरेच लोक लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्यात इंटरेस्टेड असतात. अशावेळी भविष्यातील संभाव्य नफ्यासाठी नेमकी कोणती रणनीती वापरावी याचे योग्य ज्ञान असायला हवे. तर नुकसान होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला व्हॅल्यू इन्वेस्टींग आणि ग्रोथ इन्वेस्टींग या दोन महत्वाच्या गोष्टींविषयी माहिती देणार आहोत. ज्याच्या सहाय्याने लॉन्ग टर्म इन्वेस्टर्स कोणत्याही चिंतेशिवाय गुंतवणूक करण्यासाठी योग्य पर्याय निवडू शकतील.
‘या’ आर्थिक बाबी लक्षात घ्या (Investment Strategy)
किंमत ते कमाई (P/E गुणोत्तर) – P/E गुणोत्तर हे कोणत्याही कंपनीच्या मूळ कमाईची सापेक्ष बाजारातील किंमत निर्धारित करते. कंपनीच्या बाजारभावाला तिच्या प्रति शेअर कमाईने भागून हे गुणोत्तर मिळते. ज्यातून शेअरची किंमत वाजवी आहे, कमी आहे की जास्त आहे हे सांगितले जाते.
किंमत ते बुक (P/B गुणोत्तर) – P/B गुणोत्तर हे कंपनीच्या शेअरची जितकी किंमत आहे त्याच्या मालमत्तेच्या मूल्याशी तुलना करते. (Investment Strategy) त्यामुळे जर कंपनीच्या शेअर्सची किंमत त्याच्या मालमत्तेच्या मूल्यांकनापेक्षा कमी असेल, तर शेअर अंडर रेटेड केलेला आहे असे मानले जाते.
फ्री कॅश फ्लो (FCF) – FCF हे एक मेट्रिक आहे. ज्यामध्ये कंपनीच्या ऑपरेशन्समधून येणारी रोख रक्कम आणि ऑपरेटिंग खर्च तसेच भांडवली खर्च यांचा समावेश आहे.
ग्रोथ इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय?
ग्रोथ इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे वाढवून देणारी गुंतवणूक. सामान्यतः, गुंतवणूकदार त्यांचे पैसे ग्रोथ स्टॉकमध्ये ठेवतात. यातून त्यांच्या उद्योगातील इतर कंपन्यांची किंवा संपूर्ण बाजाराच्या तुलनेत सरासरीपेक्षा जास्त कमाई वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नावाप्रमाणे ग्रोथ करून देते. (Investment Strategy) वाढत्या स्टॉक्सच्या बाबतीत, P/E गुणोत्तर प्रमाण साधारणपणे सरासरीपेक्षा जास्त असते. तसेच, कंपनीच्या EV/EBITDA चे विश्लेषण करणे आवश्यक असते आणि तसे केल्यास समजते की, हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे.
व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट की ग्रोथ इन्व्हेस्टमेंट?
बिगुलचे सीईओ अतुल पारख याचे म्हणणे आहे की, ‘आजच्या बाजारातील गतिशीलता लक्षात घ्या. असे केल्यास तुम्हाला समजेल की, मूल्य गुंतवणूक अर्थात व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट सर्व बाजूने अधिक अर्थपूर्ण आणि फायदेशीर आहे. या गुंतवणुकीत मजबूत मूलभूत घटक कमी किमतीच्या स्टॉकवर लक्ष केंद्रित करतात. (Investment Strategy) त्यामुळे सुरक्षित मार्जिन मिळू शकते. त्यामुळे व्हॅल्यू आणि ग्रोथमध्ये एक निवड करायची असेल तर व्हॅल्यू म्हणजेच मूल्य गुंतवणूक फायदेशीर आहे.