Investment Tips: भरपूर पैसे कमावण्यासाठी फॉलो करा ‘या’ 4 पद्धती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । प्रत्येकाला असे वाटते की, आपल्याकडे स्वतःचे घर, कार आणि पुरेसा बँक बॅलन्स असावा,जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करता येतील. आपण देशातील आणि जगातील सर्व श्रीमंतांबद्दल वाचतो आणि त्यांच्यासारखे होण्याची स्वप्ने पाहतो. मात्र इथे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ही सर्व लोकं असेच किंवा अचानक पैसेवाले झालेले नाहीत. त्यामागे त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत आणि त्यासाठीचे खास प्लॅनिंग आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे करोडपती होणे तर सोडाच तर घराचा खर्चही भागवणे अवघड झाले आहे. मात्र या कठीण काळातही तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता. मात्र त्यासाठी काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

तज्ज्ञांचे मत आहे की, पैसे कमावण्याचा पहिला मार्ग म्हणजे बचत करणे आणि जास्तीतजास्त बचत करणे. योग्य वेळी बचत करणे आणि संपत्ती जमा करणे याचा थेट संबंध आहे. भरपूर पैसे कमावण्यासाठी अशाच काही मार्गांची आपण चर्चा करत आहोत. जर तुम्ही वेळेवर आणि शिस्तीने याचे पालन केले तर तुम्ही नक्कीच करोडपती होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.

बचत आणि फक्त बचत
यासाठी तुम्हाला बचत करावी लागेल आणि ही बचत लवकरात लवकर सुरू करावी लागेल. व्यावसायिक जगात पाऊल ठेवल्यापासूनच आपल्याला बचत करायला सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी नोकरी किंवा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला दरमहा किमान 15,000 रुपये वाचवावे लागतील. ही बचत तुम्हाला 30 वर्षे देईल, म्हणजे जेव्हा तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर रिटायरमेंटच्या जगात प्रवेश करत असाल, तेव्हा तुमच्याकडे 5 कोटींहून जास्त रक्कम जमा झालेली असेल.

आर्थिक तज्ज्ञांनी या बचतीसाठी वार्षिक 12 टक्के रिटर्न मानला आहे. तुम्ही तुमच्या बचतीला जितका उशीर कराल तितका तुम्हाला बचतीचा भाग वाढवावा लागेल. जर गुंतवणूक सुरू होण्यास 10 वर्षांचा उशीर झाला, तर तीच बचत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये प्रति महिना करावी लागेल. होय, ही बचत नियमित असावी हे लक्षात ठेवा. यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये.

आपली बचत वाढवणे
तुम्ही दर महिन्याला बचत करण्यास सुरुवात केली आहे आणि नियमितपणे बचत करत आहात. आता ही बचतही दरवर्षी वाढवावी लागणार आहे. तुमची मासिक बचत महागाई आणि तुमचे उत्पन्न वाढेल त्याच प्रमाणात वाढवावे लागेल. वार्षिक बचतीची रक्कम वाढवून, तुम्ही लवकरच करोडपती होण्याचे तुमचे ध्येय साध्य करू शकाल. याशिवाय बचत वाढवून तुम्ही वाढत्या महागाईवरही नियंत्रण ठेवू शकाल. SIP मध्ये स्टेप-अप तुमच्या गरजेनुसार आहे. दरवर्षी 10% रक्कम वाढवणे आवश्यक नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बचत पाच टक्क्यांनीही वाढवू शकता.

योग्य ठिकाणी गुंतवणूक
जर तुम्ही बचत करत असाल मात्र ती योग्य ठिकाणी गुंतवली नाही तर तुमची मेहनत वाया जाईल. त्यामुळे बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास उत्तम रिटर्न मिळण्याची अपेक्षा जास्त असते. पोर्टफोलिओ अगदी साधा ठेवा. खूप जास्त प्रॉडक्ट्स समाविष्ट करून तुमचा पोर्टफोलिओ गुंतागुंतीचा करू नका. गुंतवणुकीची शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. लॉन्ग टर्म SIP सुरू करा. नियमित अंतराने बाजारातील तज्ञांच्या मदतीने तुमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करा. इतरांना पाहून, त्यांचे ऐकून किंवा भरघोस रिटर्नच्या आकर्षक भानगडीत पडून गुंतवणूक करू नका.

खर्चावर नियंत्रण
बचतीमुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या कष्टाचे पैसे अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळा. दिसण्यापेक्षा सोयीची जीवनशैली अंगीकारावी लागेल. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरणे टाळा. घरगुती खर्चासाठी नेहमी कॅश वापरा. बोनस किंवा अतिरिक्त मेहनतीनंतर मिळालेले पैसे घरखर्चासाठी इतरत्र गुंतवू नका.

इतर गरजांसाठी गुंतवणूक वापरणे टाळा
ज्या उद्दिष्टासाठी तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे त्यासाठीच त्याचा वापर करा. एका गुंतवणुकीचा वापर दुसऱ्या ध्येयासाठी करू नका. यामुळे तुम्हाला मुदतीपूर्वी पैसे काढावे लागतील आणि गुंतवणूक योग्य प्रकारे वाढू शकणार नाही. गुंतवणुकीचा क्रम मोडू नये म्हणून तुमची गुंतवणूक लॉक-इनच्या पर्यायामध्ये गुंतवावी लागेल. जेणेकरून तुम्हाला कितीही गरज असली तरी तुम्ही त्या गुंतवणुकीतून वेळेपूर्वी पैसे काढू शकणार नाही.

एमर्जन्सी फंड राखून ठेवा
आणीबाणीच्या काळात आपली बचतच कामी येते हे खरे आहे. मात्र कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, निश्चित लक्ष्यासाठी सुरू केलेली गुंतवणूक वापरू नका. अशा गरजांसाठी, तुम्हाला स्वतंत्र एमर्जन्सी फंड ठेवावा लागेल. एमर्जन्सी फंड तुम्हाला आपत्कालीन काळात मदत करेल. तुमच्या नियमित मासिक खर्चानुसार, तुमच्याकडे किमान 6 महिन्यांचा एमर्जन्सी फंड असावा.

Leave a Comment